शिंदे घराण्यातील पहिल्या गायिकेचं म्युझिक व्हिडिओतून संगीतक्षेत्रात पदार्पण, कोण आहे? जाणून घ्या…

शिंदे घराण्याला सांगितिक वारसा आहे. याच शिंदे घराण्यातील पहिली गायकी आता संगीतक्षेत्रात पदार्पण करतेय.

शिंदे घराण्यातील पहिल्या गायिकेचं म्युझिक व्हिडिओतून संगीतक्षेत्रात पदार्पण, कोण आहे? जाणून घ्या...
स्वरांजली शिंदे
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:10 AM

मुंबई : शिंदे घराण्याला सांगितिक वारसा आहे. प्रल्दाद शिंदेंनी आपल्या गायकीने नाव कमावलं. त्यांच्या गाण्याचे अनेकजण चाहते होते. त्यांच्यानंतर आनंद शिंदे यांच्या गाण्यांनी तर महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं. मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या गाण्यालाही पसंती मिळते. असं असलं तरी शिंदे घराण्यातील मुली मात्र कधी गाताना दिसल्या नाहीत. पण आता याच शिंदे घराण्यातील पहिली गायकी आता संगीतक्षेत्रात पदार्पण करतेय. तिचं एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिचं नाव आहे स्वरांजली शिंदे. स्वरांजलीचा “सांग रे मना…” हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिच्या गाण्याला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

स्वरांजली शिंदे कोण आहे?

गायक प्रल्दाद शिंदे यांच्यानंतर आनंद शिंदे यांच्या गाण्यांनी तर महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं. मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या गाण्यालाही पसंती मिळते. याच शिंदे घराण्यातील पहिली गायकी आता संगीतक्षेत्रात पदार्पण करतेय. तिचं एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिचं नाव आहे स्वरांजली शिंदे. स्वरांजली मिलिंद शिंदे यांची मुलगी आहे. मिलिंद शिंदे आणि आनंद शिंदे दोघे भाऊ आहेत. स्वरांजली ही आनंद शिंदे यांची पुतणी आहे.

‘ना सांगता ना बोलता छंद लागला तुझा, समजना उमजना सावरू कसा मना’ अशी मनोवस्था व्यक्त करणारा “सांग रे मना….” हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे, आजवर अनेक हिट गाणी दिलेल्या शिंदे घराण्यातील स्वरांजली शिंदे “सांग रे मना…” या गाण्याद्वारे म्युझिक व्हिडिओतून संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांची प्रस्तुती असलेल्या “सांग रे मना” या म्युझिक व्हिडिओची निर्मिती एसआरवाय प्रॉडक्शनने केली आहे. रुपेश खांदर या नव्या दमाच्या संगीतकारानं या गाण्याला संगीत दिलं आहे. तसंच स्वरांजलीसह त्यांनी गाणं गायलही आहे. तर सुहास रुके आणि माऊली कोळी या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. सप्तसूर म्युझिकने आतापर्यंत अनेक नव्या दमाच्या कलाकारांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. त्यात आता सांग वे मना या म्युझिक व्हिडिओचीही भर पडली आहे.

शिंदे घराण्यानं आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. या घराण्यातली स्वरांजली ही पहिली गायिका आहे. त्यामुळेच सांग रे मना हा म्यूझिक व्हिडिओचं वेगळं महत्त्व आहे. प्रेमामध्ये आकंठ बुडालेल्या प्रेमिकांच्या भावना सांग रे मना या गाण्यात मांडण्यात आल्या आहेत. तसंच उत्तम चित्रीकरण, उत्तम कलाकारही यात असल्यानं म्युझिक व्हिडिओही जमून आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेमिकाची सांग रे मना ही भावना आता सुरेल आणि देखण्या पद्धतीनं चित्रीत झाली आहे. सहजसोपे शब्द आणि तितकंच श्रवणीय संगीत आहे. त्यामुळे या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

इतर बातम्या

Single Movie : अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब यांच्या ‘सिंगल’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला रिलीज होणार

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड, वाचा सविस्तर…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.