Maharani 2 Teaser Out : अखेर ‘महाराणी 2’ ची प्रतीक्षा संपली, हुमा कुरेशीच्या दमदार वेब सीरिजचा टीझर रिलीज!
यापूर्वी हुमा कुरेशीने वेब सीरिज महाराणी 2 चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केले होते. या पोस्टला त्यांनी कॅप्शनही दिले आहे. हुमा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती परत येत असल्याचे लिहिले. महाराणी सीझन 2 लवकरच येत आहे, तुम्ही आम्हाला मागच्या वेळी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभारी आहे.
मुंबई : अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) लवकरच ओटीटीवर पुनरागमन करणार आहे. हुमा कुरेशी महाराणी 2 मध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे महारानी 2 चा टीझर देखील रिलीज झालायं. हुमा यांनी सोशल मीडियावर महाराणी 2 या वेब सीरिजचा टीझर (Teaser) शेअर केला आहे. महाराणी ही वेब सीरिज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेल्या या सीरिजचा पहिला भागही लोकांना प्रचंड आवडला. तेव्हापासून प्रेक्षक (Audience) त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुन्हा एकदा हुमा राणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
यापूर्वी हुमा कुरेशीने वेब सीरिज महाराणी 2 चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केले होते. या पोस्टला त्यांनी कॅप्शनही दिले आहे. हुमा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती परत येत असल्याचे लिहिले. महाराणी सीझन 2 लवकरच येत आहे, तुम्ही आम्हाला मागच्या वेळी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभारी आहे, आमचे प्रेम आणि मेहनत तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही, उद्या टीझर येईल असं म्हटलं होतं.
हुमा कुरेशीने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे कौतुक
पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षक महाराणीच्या दुसऱ्या भागाची वाट गेल्या अनेक दिवसांपासून पाहात होते. राजकीय विषयावर असलेल्या वेब सीरिजचा पहिला भाग चाहत्यांना आवडला. आता वेब सीरिजच्या टीझरनंतर, चाहते त्याच्या नवीन सीझनसाठी खूपच उत्सुक झाले आहेत, सर्वजण हुमा कुरेशीने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे कौतुक करत आहेत, प्रत्येकजण तिच्या लूकबद्दल बोलत आहे. विशेष म्हणजे पहिल्या सीझनमध्ये हुमाची भूमिका सर्वांनाच आवडली होती.