RaanBaazaar: ‘रानबाजार’मधील बोल्ड भूमिकेवरून झालेल्या टीकांवर तेजस्विनीचं परखड मत; म्हणाली..

तेजस्विनी (Tejaswwini Pandit) यामध्ये आयेशा नावाच्या देहविक्रेय करणाऱ्या तरुणीची भूमिका साकारतेय. तेजस्विनी आणि प्राजक्ताच्या बोल्ड भूमिकांवरून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्विनीने त्यावर तिचं मत मांडलंय.

RaanBaazaar: 'रानबाजार'मधील बोल्ड भूमिकेवरून झालेल्या टीकांवर तेजस्विनीचं परखड मत; म्हणाली..
Tejaswwini Pandit Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 7:35 AM

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘रानबाजार’ (RaanBaazaar) ही वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswwini Pandit) आणि प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) भूमिकांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली. तेजस्विनी यामध्ये आयेशा नावाच्या देहविक्रेय करणाऱ्या तरुणीची भूमिका साकारतेय. तेजस्विनी आणि प्राजक्ताच्या बोल्ड भूमिकांवरून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्विनीने त्यावर तिचं मत मांडलंय. त्याचप्रमाणे मराठी वेब सीरिजमधील भूमिकांकडे पाहण्याच्या प्रेक्षकांच्या दृष्टीकोनाबद्दलही ती व्यक्त झाली. ‘रानबाजार’मध्ये तेजस्विनी आणि प्राजक्तासोबतच उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे आणि अभिजीत पानसे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी तिच्या भूमिकेबद्दल म्हणाली, “मी या सीरिजमध्ये आयेशाची भूमिका साकारतेय. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही खूप वेगळी आहे. या सीरिजच्या टीझर आणि ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. टीझरमध्ये माझा बोल्ड अंदाज पाहून अनेकांना धक्का बसला. पण सुदैवाने मला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी मी, प्राजक्ता आणि दिग्दर्शक अभिजीत मिळून काही देहविक्रेय करणाऱ्या महिलांची भेट घेतली. त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांच्यासारखा बिनधास्त अंदाज भूमिकेत उतरविण्याचा प्रयत्न केला.”

हे सुद्धा वाचा

पहा टीझर-

सीरिजमधील बोल्ड भूमिकेवरून तेजस्विनी आणि प्राजक्तावर टीकाही झाली. त्याबद्दल प्रतिक्रिया देताना तेजस्विनी म्हणाली, “होय, मी सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचा स्वीकार करण्यास तयार आहे. मी सर्व प्रेक्षकांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही आधी वेब सीरिज पहा, त्याचा विषय समजून घ्या आणि त्यानंतर आमच्यावर टीका करा. लोकांनी आता त्यांचा दृष्टीकोन बदलण्याची खूप गरज आहे. हिंदीतील बोल्ड वेब सीरिजवर कौतुकाचा वर्षाव होतो, पण मराठीत असं काही पाहिल्यावर त्यांची मानसिकता बदलते. आपल्याला हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे.”

सीरिजच्या भूमिकेसाठी कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळाल्याचंही तिने यावेळी सांगितलं. “माझ्या या प्रवासात परिवाराने खूप मोलाची साथ दिली. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला आणखी चांगलं काम करण्याची इच्छा होते”, असं ती म्हणाली. ‘रानबाजार’ ही सीरिज 20 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित ही सीरिज असल्याचं म्हटलं जातंय. राजकारण, त्यातील धूर्त डावपेच, हनी ट्रॅप, उत्कंठा, नाट्यमय थरार हे सगळंच या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळालं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.