‘द फॅमिली मॅन’चा नवा विक्रम, जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज, ‘फ्रेंड्स’लाही टाकले मागे!

अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), शरिब हाश्मी (Sharib Hashmi)आणि अभिनेत्री समांथा अक्किनेनी (Samantha) स्टारर वेबसीरीज 'द फॅमिली मॅन 2' (The Family Man 2) नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनलाही पहिल्या सीझनप्रमाणेच चाहत्यांचे तितकेच प्रेम मिळाले आहे.

‘द फॅमिली मॅन’चा नवा विक्रम, जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज, ‘फ्रेंड्स’लाही टाकले मागे!
द फॅमिली मॅन 2
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 4:11 PM

मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), शरिब हाश्मी (Sharib Hashmi)आणि अभिनेत्री समांथा अक्किनेनी (Samantha) स्टारर वेबसीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनलाही पहिल्या सीझनप्रमाणेच चाहत्यांचे तितकेच प्रेम मिळाले आहे. अशा परिस्थितीत आता या सीरीजनेही आपल्या नावावर खास विक्रम नोंदवला आहे (The Family Man 2 becomes 4th most popular web series on IMDB).

या सीरीजची नवीन कथा चाहत्यांना खूप आवडली आहे. ही सीरीज समीक्षकांच्या पातळीवरही चांगलीच गाजली आहे. एकीकडे प्रत्येकजण या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरीजचे कौतुक करत आहेत, दुसरीकडे ‘द फॅमिली मॅन 2’ने एक नवीन विक्रम नोंदवला आहे.

IMDBवर जबरदस्त रेटिंग!

अभिनेता मनोज बाजपेयीची ही सीरीज आयएमडीबीवरील जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज बनली आहे, हे जाणून चाहत्यांना देखील आनंद होईल. ‘द फॅमिली मॅन 2’ जगभरातील लोकप्रिय सीरीजमध्ये चौथ्या क्रमांकाची सीरीज बनली आहे.

यासह, या सीरीजला आयएमडीबीवर 10 पैकी 8.8 स्टार देण्यात आले आहेत. या रेटिंगसह, ‘द फॅमिली मॅन 2’ जगातील सर्वोत्तम 5 वेब सीरीजच्या यादीत सामील झाली आहे.

‘फ्रेंड्स’लाही टाकले मागे!

या अनोख्या विक्रमामुळे या सीरीजने बर्‍याच महान आणि लोकप्रिय सीरीजना मागे टाकले आहे. आता ‘द फॅमिली मॅन 2’ ने ‘फ्रेंड्स’, ‘ग्रेज अनोटोमी’ यासारख्या मालिकांना मागे टाकले आहे. तर ‘लोकी’, ‘स्वीट टूथ’ आणि  ‘मियर ऑफ ईस्टटाउन’ अद्याप फॅमिली मॅनपेक्षाही पुढे आहेत.

अभिनेता मनोज बायपेजी यांनी स्वत: चाहत्यांना या खास विक्रमाची माहिती दिली आहे. या अभिनेत्याने अलीकडेच ट्विटद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने लिहिले की, द फॅमिली मॅन 2 हा जगातील चौथा सर्वाधिक लोकप्रिय शो बनला आहे.

पहिल्या सीझनला ही उत्स्फूर्त प्रतिसाद

यापूर्वी मालिकेचा पहिला सीझनदेखील चाहत्यांनी खूप पसंत केला होता. या वेळी सीरीजची कहाणी नवीन ट्विस्टसह सादर केली गेली आहे. ज्यामध्ये आता श्रीकांत तिवारी एका खासगी कंपनीत नोकरी करताना दाखवले आहेत. या सीरीजमध्ये यावेळी फॅमिली ड्रामा देखील भरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार शोच्या तिसर्‍या सीझनची तयारी सुरू झाली आहे. जर या वृत्तावर विश्वास ठेवला गेला, तर पुन्हा या मालिकेत नवा दाक्षिणात्य सुपरस्टार दिसणार आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप तिसर्‍या सीझनची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

(The Family Man 2 becomes 4th most popular web series on IMDB)

हेही वाचा :

अनुष्का शर्मा ते अनन्या पांडे, बॉलिवूडच्या कलाकारांनी शेअर केल्या वडिलांसोबतच्या आठवणी!

Avika Gor | लग्नाविनाच ‘बालिका वधू’ 18 वर्षांनी मोठ्या सहकलाकाराच्या बाळाची आई?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.