‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियमणी विद्या बालनची बहीण, एकमेकींच्या बाँडिंगबद्दल सांगताना म्हणाली…

प्रियामणी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिची चुलत बहिण आहे. याबद्दल सांगताना तिने म्हटले की, तिचे वडील आणि विद्या बालनचे वडील एकमेकांचे सख्ख्ये चुलत भाऊ आहेत. या नात्याने ती विद्याची बहीण आहे.

‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियमणी विद्या बालनची बहीण, एकमेकींच्या बाँडिंगबद्दल सांगताना म्हणाली...
विद्या-प्रिया
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 1:05 PM

मुंबई : ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man 2) या हिंदी वेब सीरीजमधून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री प्रियामणी (Priyamani) ही सध्या पुन्हा चर्चेत आहे. या मालिकेत प्रियामणीने सुचीची भूमिका साकारली आहे. श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे. सीरीजमध्ये तिची अरविंदशी मैत्री दाखवण्यात आली आहे. ही सीरीज पाहिलेल्या प्रत्येकाला लोणावळ्यात घडलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे (The Family Man 2 fame actress Priyamani is cousin sister of Vidya Balan).

टीव्ही 9 ने या निमित्ताने नुकतीच प्रियामणीची मुलाखत घेतली, ज्यात तिने सांगितले की, लोणावळ्यात काय घडले, हे तिला स्वतःलाच माहित नाही. निर्मात्यांनी केवळ एक छोटासा सीन दाखवून याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. लोकांना याचे उत्तर फक्त तिसर्‍या सिझनमध्ये पहायला मिळेल. ज्यासाठी त्यांना पुढील एक-दोन वर्षे थांबावे लागेल.

विद्या बालनची बहीण आहे प्रियामणी

प्रियामणी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिची चुलत बहिण आहे. याबद्दल सांगताना तिने म्हटले की, तिचे वडील आणि विद्या बालनचे वडील एकमेकांचे सख्ख्ये चुलत भाऊ आहेत. या नात्याने ती विद्याची बहीण आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला विद्याच्या यशाचा अभिमान आहे आणि ते बर्‍याचदा विद्याच्या चित्रपटाविषयी घरी चर्चा करतात.

प्रियामणीने म्हटले की, विद्याचा आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचा ट्रेलर तिने अद्याप पाहिलेला नाही. ज्याची आजकाल सर्वत्र खूप चर्चा आहे. विद्याच्या चित्रपटाच्या ट्रेलरने या चित्रपटाविषयी लोकांमध्ये अशी क्रेझ निर्माण केली आहे की, ते तो चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

प्रियामणीच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांनी शेरनीचा ट्रेलर पाहिला आणि विद्याच्या कामाचे कौतुक केले आहे. घरी विद्याच्या यशाबद्दल बर्‍याचदा चर्चा होत असतात. प्रिया सांगते की, ती विद्याचीही खूप मोठी चाहती आहे आणि तिच्याप्रमाणे मीसुद्धा विचारपूर्वक कामाची निवड करते. प्रियाला विद्याचे ‘शकुंतला देवी’, ‘मिशन मंगल’, ‘कहानी’ यासारखे चित्रपट खूप आवडतात.

उद्या प्रदर्शित होणार शेरनी

विद्या बालनचा ‘शेरनी’ हा चित्रपट उद्या म्हणजेच 18 जून रोजी Amazon प्राईमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात विद्या जंगलातील वाघाच्या हल्ल्यापासून गावातील लोकांना वाचवण्याच्या मोहिमेवर असलेल्या वन अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या कामात सिस्टम तिच्या मार्गात कशी येईल आणि ती जंगलातील लोकांना कशी वाचवेल, अशी रंजक तथ्यांच्या मदतीने एक दमदार कथा दाखवली जाणार आहे.

(The Family Man 2 fame actress Priyamani is cousin sister of Vidya Balan)

हेही वाचा :

PHOTO | पत्नी सुनिता आहुजाच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलं कुटुंब, पाहा गोविंदाचे ‘फॅमिली’ फोटो

Salman Khan Upcoming Film | ‘रेड’ फेम दिग्दर्शक राजकुमार गुप्ताची स्क्रिप्ट सलमानला आवडली! अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.