‘इन्टू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’चा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला, बेअर ग्रिल्ससोबत दिसणार ‘सिंघम’ अजय देवगण!
डिस्कव्हरी या भारतातील आघाडीच्या रिअल लाईफ मनोरंजन नेटवर्कने गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विक्रमाला गवसणी घालणारा आणि अतिशय सुप्रसिद्ध ठरलेला मॅन वर्सेस वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स या कार्यक्रमाचा संस्मरणीय एपिसोड सादर केला होता.
मुंबई : डिस्कव्हरी या भारतातील आघाडीच्या रिअल लाईफ मनोरंजन नेटवर्कने गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विक्रमाला गवसणी घालणारा आणि अतिशय सुप्रसिद्ध ठरलेला मॅन वर्सेस वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स या कार्यक्रमाचा संस्मरणीय एपिसोड सादर केला होता. नंतर सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार अशा दिग्गजांचा समावेश त्या नेटवर्कवर झाला होता. हे नेटवर्क आता बॉलिवूडमधील सुपर कॉप अजय देवगणचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाचा नवीन थरारक सीजनला आणत आहे.
हिंदी महासागरामध्ये शूट झालेल्या या आपल्या अतिशय बहुप्रतीक्षित शो कार्यक्रमाची पहिली झलक आज डिस्कव्हरीने सादर केली. बॉलिवूडचा लाडका अभिनेता आणि वाईल्ड आयकॉन बेअर ग्रिल्स एका अतिशय साहसी व थरारक अन्य प्रदेशामधील ठिकाणी कसे जातात, हे यात बघता येईल.
अत्यंत थरारक असणार एपिसोड!
डिस्कव्हरी+ वरील या एक्स्क्लुझिव्ह कार्यक्रमामध्ये, जगातील सुप्रसिद्ध साहसपटू बेअर ग्रिल्स आणि बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण हे एका सर्व्हायव्हल अनुभवाच्या दिशेने जातात, ज्यामध्ये शार्क्सचे वर्चस्व असलेल्या प्रतिकूल वातावरण असलेल्या समुद्रामधून त्यांचा प्रवास सुरू होतो व अंतिमत: ते निर्जन बेटांच्या दिशेने जातात. जगभरातील अनेक प्रतिष्ठित दिग्गज लोकांसह अशा अनेक मोहीमा केलेला हा दिग्गज साहसपटू कुटुंब, करिअर आणि नवीन सीजनमधील जीवन अशा अनेक बाबींबद्दल अजय देवगणसोबत मनसोक्त बोलताना दिसला आहे. त्याच्या कंफर्ट झोनमधून पुढे जाऊन अजय देवगण त्याच्या रिअल लाईफ साहसासाठी काही एंड्युरन्स कौशल्ये शिकण्याच्या पलीकडे जाऊन हिंदी महासागरातील सर्वांत वेगळ्या पडलेल्या बेटांपैकी एका बेटावर सर्व्हायव्ह करण्यासाठी आपले इन्स्टिंक्त, प्रयत्न आणि जिद्द सोबत घेऊन जाताना दिसेल.
थरारक अनुभवाबद्दल सांगताना अजय म्हणतो…
‘वाईल्डमधील माझा हा आजवरचा पहिलाच अनुभव आहे आणि मी सांगू शकतो की, ही गोष्ट अजिबात सोपी नाही! माझे बाबा अॅक्शन दिग्दर्शक होते आणि भारतीय चित्रपटातील 30 वर्षांच्या माझ्या करिअरमध्ये मला अनेक भूमिका करायला मिळाल्या व त्यामध्ये काही धोकादायक साहसी भूमिकाही होता. आणि अशा वेळेपैकी हा एक क्षण होता जेव्हा मला तिथे शिकलेल्या गोष्टी परत एकदा टेस्ट कराव्या लागल्या. मला ही संधी मिळाल्याचा मला अतिशय आनंद आहे. कारण त्यामुळे मला पुढे जाऊन माझ्या कंफर्ट झोनच्या पलीकडे जाता आलं. निसर्गासोबतचे अतिशय आवश्यक असे नाते विकसित करून निसर्गाचा शोध घेण्यासाठी कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणा-या आणि अर्थातच अशा भागात मला सुरक्षित ठेवणा-या बेअरला विशेष सॅल्यूट. भुकेल्या वनांपासून ते महासागरांमधील खोलीपर्यंत बेअरने सर्व अनुभवले आहेट, असे अजय देवगणने आपल्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले.
अजयचे कौतुक करताना बेअर ग्रिल्स म्हणतो..
‘दिग्गज अभिनेता अजय देवगणला अशा वाईल्ड परिसरात नेणे व त्याच्यासह साहस करणे ही मोठी गोष्ट होती. वाळवंटातील बेटे टिकाव धरण्यासाठी नेहमीच कठीण असतात आणि अजयने अशा भागातून सुखरूप परत येण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण कटिबद्धता दाखवली. तो अतिशय प्रामाणिक आहे व त्याच्या जीवनातील आणि करिअरमधील अनेक अनुभव त्याने मला सांगितले व त्याची प्रामाणिकता मला अतिशय भावली. अजयबद्दल मी एक गोष्ट ही शिकलो की, तो अगदी शांत बोलणारा पण हृदयामध्ये अतिशय प्रेम आणि सामर्थ्य असलेला माणूस आहे’, असे बेअर ग्रिल्सने अजय देवगणसोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले.
जगभरात होणार प्रदर्शित
डिस्कव्हरी+ वर एक्स्क्लुझिव्ह प्रकारे उपलब्ध असलेले ‘इंटू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स अँड अजय देवगण’ आपल्या पॉवर पॅक एपिसोडसह 22 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 6 वाजता फक्त डिस्कव्हरी+ वर प्रेक्षक पाहू शकतात. या स्पेशल भागाचा ब्रॉडकास्ट प्रिमियर डिस्कव्हरी चॅनल, डिस्कव्हरी एचडी, डिस्कव्हरी तमिल, एनिमल प्लॅनेट एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, डिस्कव्हरी आयडी, डिस्कव्हरी आयडी एचडी, डिस्कव्हरी सायंस, डिस्कव्हरी टर्बो, डिस्कव्हरी किडस, युरोस्पोर्ट आणि युरोस्पोर्ट एचडीसह 14 लिनियर चॅनल्समध्ये 25 ऑक्टोबर रोजी रात्री 8:00 वाजता केला जाणार आहे.
हेही वाचा :
Audio Books : पुस्तक संस्कृती जतन करण्यासाठी ‘ऑडिओ बुक’ उत्तम पर्याय!, मराठमोळ्या कलाकारांचं मत