‘The Wire’ फेम अभिनेता मायकल विल्यम्सचे निधन, न्यूयॉर्कस्थित अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता मायकेल के. विल्यम्स यांचे निधन झाले आहे (Michael K. Williams Passed Away). ते 54 वर्षांचे होते. सोमवारी न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन पेंटहाऊस अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. न्यूयॉर्क शहर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

‘The Wire’ फेम अभिनेता मायकल विल्यम्सचे निधन, न्यूयॉर्कस्थित अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह
Michel Williams
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 10:50 AM

मुंबई : प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता मायकेल के. विल्यम्स यांचे निधन झाले आहे (Michael K. Williams Passed Away). ते 54 वर्षांचे होते. सोमवारी न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन पेंटहाऊस अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. न्यूयॉर्क शहर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांना मायकेलचा मृत्यू असामान्य वाटत आहे, त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याची चौकशी केली जाईल. घटनास्थळाकडे पाहताना, पोलिसांना संशय आहे की, मायकेलचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या संपूर्ण तपासात गुंतले आहेत.

मायकल त्याच्या टीव्ही शो ‘द वायर’साठी प्रसिद्ध होता. या शोमध्ये त्याने ड्रग डीलर ओमर लिटल नावाच्या दुष्ट डाकूची भूमिका साकारली होती. या स्वरूपात, तो अनेक दशकांपर्यंत दूरचित्रवाणीवरील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक बनला होता. त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. ‘द वायर’मध्ये त्याने ओमर लिटल नावाच्या गुन्हेगाराची भूमिका केली होती, ज्याला कठोर नैतिक संहिता होती. त्याला क्रूरता पसरवून प्रतिष्ठा मिळवायची होती, जी प्रत्यक्ष वास्तवाच्या पलीकडे होती.

दमदार अभिनय आणि पात्रांसाठी प्रसिद्ध होता अभिनेता

त्याच्या तोंडात सिगारेट आणि अतिशय स्टायलिश पद्धतीने चालण्याच्या शैलीमुळे लोक अजूनही त्याच्या प्रवेशाने प्रभावित होत असत. त्यांची अनोखी शैली त्यावेळी खूप प्रसिद्ध होती. ते आत गेल्यावर ‘द फार्मर इन द डेल’ हे गाणे गुणगुणत असत. 2002पासून 2008पर्यंत ‘द वायर’चे पाच सीझन आले होते, त्या सर्वांमध्ये मायकेल के. विल्यम्स त्यांच्या सशक्त भूमिकेत दिसले होते. प्रत्येक सीझनमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेत एक नवीनपणा होता.

त्यांचा परफॉर्मन्स पाहून लोक अनेक वेळा रिपीट-टेलिकास्टवर हा शो बघायचे. यावरून, ‘द वायर’चा हा छोटा ओमर किती प्रसिद्ध होता याचा अंदाज लावता येतो. ते कुठेही गेले तरी त्यांच्या या शोच्या काही संस्मरणीय ओळी पुन्हा पुन्हा सांगायचे. जसे ‘A man gotta have a code’, ‘all in the game yo, all in the game’. एवढेच नाही तर ते या शोमध्ये समलिंगी म्हणूनही दिसले होते. त्यांच्या समलिंगी व्यक्तीच्या या पात्राद्वारे त्यांनी टीव्हीचे स्टीरिओ टाईप मर्यादाही मोडल्या.

या शो व्यतिरिक्त, ब्रुकलिनमध्ये जन्मलेले विल्यम्स दोन दशकांहून अधिक काळ अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांचा भाग बनले होते. ज्यात एचबीओ सीरीज ‘बोर्डवॉक एम्पायर’ आणि ‘लव्हक्राफ्ट कंट्री’, तर चित्रपटांमध्ये ‘12 इयर्स अ स्लेव्ह’, ‘Assassin’s Creed’, ‘Girls’, आणि ‘Gone Baby Gone’ सारखे अनेक हिट चित्रपट समाविष्ट होते.

हेही वाचा :

कधी चित्रपटाचा सेट तर कधी डेट, ‘अशी’ होती तुमच्या लाडक्या बॉलिवूडकरांची अन् त्यांच्या जोडीदारांची पहिली भेट!

Happy Birthday Radhika Apte: परदेशी व्यक्तीशी गुपचूप लग्न , ‘या’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा अभिनेत्री राधिका आपटेबद्दल…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.