Christmas Release | कुली नं 1 आणि वंडर वुमन यांच्यात चुरस होणार, कोण मारणार बाजी?

कोरोनामुळे सर्व चित्रपटगृह बंद झाली होती आणि त्यानंतर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत.

Christmas Release | कुली नं 1 आणि वंडर वुमन यांच्यात चुरस होणार, कोण मारणार बाजी?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 12:15 PM

मुंबई : कोरोनामुळे सर्व चित्रपटगृह बंद होती आणि त्यानंतर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. चित्रपटगृह सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळत नाही. आता ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक चित्रपट रॉक होण्यास तयार देखील झाले आहेत. मात्र, सर्वच चित्रपट चित्रपटगृहांवर प्रदर्शित होणार नाहीत. यातील एक चित्रपट ओटीटीवरही रिलीज होत आहे. तसेच सर्वच चित्रपटांचे विषय भिन्न आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांकडे देखील अनेक पर्याय उपलब्ध असतील आहेत. (Varun-Richa and many other films will be screened at Christmas)

कुली नंबर 1 वरुण आणि साराचा कुली नंबर 1 हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या दोघांव्यतिरिक्त परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, जावेद जाफरी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 90 च्या दशकात आलेल्या कुली नंबर 1 चित्रपटाचा रिमेक हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बहुतेक शूट बँकॉकमध्ये केले गेले आहे. 1995 सालमध्ये कुली नंबर 1 हा वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी बनवले होते.

या चित्रपटात करिश्मा कपूर, गोविंदा, शक्ती कपूर आणि कादर खान यांच्या प्रमुख भूमिकेत होते. वरुण आणि साराच्या कूली नंबर 1 ने आतापर्यंत बरीच गाणी रिलीज केली आहेत आणि सर्वांनाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरुण आणि साराचा हा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी हा चित्रपट 1 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार होता पण कोरोनाच्या संकटामुळे ते शक्य झाले नाही.

शकीला

ऋचा चड्ढाचा शकीला हा चित्रपट या ख्रिसमसला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील ऋचा चड्ढाचा बोल्ड लूक प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करेल. मुस्लिम कुटुंबातील असूनही शकीला वयाच्या 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत दाखल झाली होती.. 24 डिसेंबर रोजी वंडर वूमन थिएटरमध्ये रिलीज होत आहे. वंडर वूमन हॉलिडे हंगामातील सर्वात मोठा रिलीज होणार चित्रपट आहे. परंतु कोरोनामुळे 25 डिसेंबरला HBO Max रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या : 

Photo : सारा आणि वरुण ‘कुली नं 1’साठी सज्ज, रोमँटिक अंदाजात फोटोशूट

Sara Ali Khan | ‘Coolie No. 1’च्या ट्रेलरवर डिसलाईक्सच्या वर्षावाची तयारी, सुशांतच्या चाहत्यांचा सारा अली खानवर राग!

(Varun-Richa and many other films will be screened at Christmas)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.