Sherni : विद्या बालनच्या ‘शेरनी’ गर्जना!, ट्रेलर आला; 18 जूनला होणार चित्रपट प्रदर्शित!
या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असून एका वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत ती झळकणार आहे. (Vidya Balan's 'Sherni's roar!, trailer arrives; Movie to be released on June 18!)
मुंबई : अमेझॉन प्राईम व्हिडीओद्वारे बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपट शेरनी (Sherni) जगातील 240 हून अधिक देशांमध्ये 18 जून रोजी प्रदर्शित होणार असून त्याच्या ट्रेलरचं प्रकाशन आज करण्यात आलं आहे. या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असून एका वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत ती झळकणार आहे.
पाहा ट्रेलर (SHERNI Trailer)
फिल्ममेकर अमित मसुरकर यांचं दिग्दर्शन
टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या मस्ट वॉच प्रकारातील चित्रपटाचं दिग्दर्शन समीक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर यांनी केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीसाठी अमित प्रसिद्ध आहेत.
सिनेमाचा ट्रेलर रोमांचक
आपल्या पितृसत्ताक पद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी मानवी श्वापदे वावरत असतात, विद्या ज्या विभागात कार्यरत असते, तिथली उदासीनताच तिला जोशाने स्वत:ची धमक सिद्ध करण्याची ऊर्जा देते. चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. हे जग चमत्कारी, आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले आहे. आपली चाकोरी बाहेरची नोकरी सांभाळून विद्या विवाहित आयुष्य जगत असते. हे करत असताना मानव नावाच्या पशूचा सामना तिला करावा लागतो. या चित्रपटात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्या मुख्य भूमिका असतील.
अभिनेत्री विद्या बालननं व्यक्त केल्या भावना
ट्रेलर लॉन्चप्रसंगी स्वत:चा उत्साह व्यक्त करताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली की, ‘मी पहिल्यांदा शेरनी’चे कथानक ऐकलं आणि ते मला भावलं. मी व्यक्तिरेखेत शिरले. मी साकारत असलेली चित्रपटातील विद्या काही शब्दांत समजावून घेता येईल. मात्र व्यक्तिरेखेचे अनेक पैलू आहेत. या चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. आदर, परस्परांना समजून घेणे आणि सह-अस्तित्वाच्या धाग्यांनी गुंतलेले आहे. ते केवळ मानव-पशू द्वंद नसून माणसा-माणसातील नात्यांवर भाष्य करणारे आहे. ही अभिनव व्यक्तिरेखा साकारताना मला फारच आनंद झाला. अमेझॉन प्राईम व्हिडियोच्या माध्यमातून हे कथानक जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल आणि त्यांना अनपेक्षित मार्गांनी गुंतवून ठेवेल ही आशा बाळगते.”
भारत आणि 240 हून अधिक देश-प्रदेशातील प्राईम सदस्यांना 18 जूनपासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘शेरनी’ पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या
Photo : ‘सागर जैसी आँखों वाली…..’, रुचिरा जाधवचे सुंदर फोटो
श्रीदेवीने निधनापूर्वी लेकीला दिला खास सल्ला, आईच्या आठवणी सांगताना जान्हवी कपूर म्हणते…