वेब सीरीज AK vs AK अडकली वादात, भारतीय वायुसेनाने दिग्दर्शकांना पाठवले पत्र!
अलिकडेच नेटफ्लिक्सने (Netflix) भारतातील मॉक्यूमेंट्रीवर आधारित AK vs AK या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज केला होता.
मुंबई : अलिकडेच नेटफ्लिक्सने (Netflix) भारतातील मॉक्यूमेंट्रीवर आधारित AK vs AK या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज केला होता. या वेब सीरीजमध्ये अनिल कपूर आणि अनुराग कश्यप दिसत होते. ही वेब सीरीज आता वादात सापडली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर यामधील काही दृश्यामध्ये ट्रेलरमध्ये अनिल कपूरने भारतीय वायुसेनेचा गणवेश परिधान केलेला दिसत आहे.(Web series AK vs AK stuck in controversy, letter sent by Indian Air Force to director)
यामध्ये मारामारी, शिव्या आणि डान्स भारतीय वायुसेनेचा गणवेश परिधान करून करण्यात आल्याचे दिसत आहे. यामुळे आता भारतीय वायुसेनेने याबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपला पत्र लिहिले आहे.
The IAF uniform in this video is inaccurately donned & the language used is inappropriate. This does not conform to the behavioural norms of those in the Armed Forces of India. The related scenes need to be withdrawn.@NetflixIndia @anuragkashyap72#AkvsAk https://t.co/F6PoyFtbuB
— Indian Air Force (@IAF_MCC) December 9, 2020
या पत्रात भारतीय हवाई वायुसेनेने म्हटले आहे की, ट्रेलरच्या व्हिडिओमध्ये भारतीय वायुसेनेचा गणवेश चुकीचा पध्दतीने परिधान केलेला दिसत आहे. तसेच, गणवेश घालून वापरलेली भाषा अयोग्य आहे. हे भारताच्या सशस्त्र दलातील वर्तणुकीला सुसंगत नाही. संबंधित देखावे मागे घेणे आवश्यक आहे.
आर्मीच्या थीमवर कोणताही चित्रपट, माहितीपट किंवा वेब सीरीज प्रसारित होण्यापूर्वी प्रॉडक्शन हाऊसला मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचा सल्ला देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. सैन्यात अधिकारी आणि लष्करी गणवेशाचा अवमान केल्याच्या तक्रारी मंत्रालयाला आल्या असून त्यानंतर मंत्रालयाने आक्षेप घेतल्याचेही या पत्रात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर संरक्षण मंत्रालयाने माहिती व प्रसारण मंत्रालयाला एक पत्रही लिहिले होते.
बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आता डिजिटल प्लेटफॉर्मवर पहिले पाऊल लवकरत ठेवणार आहे. कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद निर्मात्यांची पहिली पसंती ठरली आहे. शाहिद सध्या त्याच्या आगामी जर्सी चित्रपटाच्या चित्रीकरणात असून लवकरच करण जोहरच्या चित्रपट योद्धामध्ये दिसणार आहे. पण त्याआधी तो डिजिटल पदार्पण करणार आहे. या प्रोजेक्टला राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित करणार आहेत.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, योद्धाला शशांक खेतान डायरेक्ट आणि करण जोहर निर्मित करणार आहेत. पण याआधी शाहिद अॅमेझॉन प्राइमच्या वेब सीरीजची शूटिंग पूर्ण करणार असून हा एक अॅक्शन थ्रिलर प्रोजेक्ट असणार आहे, ज्याची शूटिंग मुंबई आणि दिल्लीमध्ये होणार आहे. रिपोर्ट्सनुसार शाहिदने यापूर्वीच आपल्या डेब्यू प्रोजेक्टच्या शूटिंगचा निर्णय घेतला आहे. त्याचे शूटिंग जानेवारी 2021 मध्ये सुरू होईल. अॅमेझॉन प्राइमच्या या प्रोजेक्टचे शूटिंग जानेवारी ते एप्रिल या काळात होईल. एप्रिलमध्ये त्याचे शूटिंग संपल्यानंतर शाहिद योद्धाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. शाहिद कपूर अखेर कबीर सिंगमध्ये दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
संबंधित बातम्या :
Husnn Hai Suhana Song Out : ‘कुली नंबर 1’ चे आणखीन एक गाणे रिलीज वरुण आणि साराची जबरदस्त केमिस्ट्री!
Rahul Roy | राहुल रॉय यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ‘स्ट्रोक’ चित्रपटातून करणार पुनरागमन!
(Web series AK vs AK stuck in controversy, letter sent by Indian Air Force to director)