पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्यायला अटक, विद्यार्थिनीने केला छेडछाडीचा आरोप!

प्रसिद्ध पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्याय यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्यायला अटक, विद्यार्थिनीने केला छेडछाडीचा आरोप!
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 11:49 AM

दिल्ली : प्रसिद्ध पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्याय यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रविशंकर उपाध्याय यांच्यावर त्यांच्या कथक सेंटरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानीने विनयभंग आणि गैरकृत्य केल्या प्रकरणी चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. पंडित रविशंकर उपाध्याय यांच्या अटकेला नवी दिल्ली जिल्हा डीसीपीने दुजोरा दिला आहे.(Pakhwaj musician Pandit Ravi Shankar Upadhyay arrested)

पंडित रविशंकर उपाध्याय यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता तिथून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित विद्यार्थ्याने सांगितले आहे की ती गेल्या 11 वर्षांपासून चाणक्यपुरी येथील कथकच्या राष्ट्रीय संस्थेमधून शिकत आहे. डिप्लोमा कोर्स करण्याव्यतिरिक्त ती कथक शिकत आहे. ती पंडित रविशंकर उपाध्याय कडून पखवाज शिकत होती.

पीडित मुलीने सांगितले की, पंडित रविशंकर आपल्याशिवाय बर्‍याच मुलींसोबत त्यांनी छेडछाड केली आहे. पंडित रविशंकर हे तिच्या पायाला स्पर्श करून अश्लील गोष्टी करायचे आणि हे गेल्या दीड वर्षापासून चालू होते. जानेवारी 2020 मध्ये अश्लील मेसेज देखील पाठविले होते. जेव्हा पंडित रविशंकरने पीडितेसोबत केंद्रात अश्लील कृत्य केले तेव्हा ती तेथून पळून गेली आणि वरिष्ठांकडे तक्रार केली आणि संपूर्ण घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर सर्वकाही त्याच्या पालकांना कळविल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

महापालिका शाळेत एक दोन नव्हे तर तब्बल 15 पेक्षा अधिक मुलींचा विनयभंग  झाल्याचा प्रकार समोर आला होता.  धक्कादायक म्हणजे हा विनयभंग कुणी दुसऱ्या-तिसऱ्याने नव्हे तर शिक्षकानेच केल्याचा आरोप करण्यात आला होता. खासगी संगणक शिक्षक गेल्या 2 महिन्यांपासून विनयभंग करत होता.

या नराधम शिक्षकाने सहावी ते आठवीच्या विद्यार्थिनींचा 15 पेक्षा जास्त मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.  याप्रकरणी शिक्षक लोचन परुळेकरला तुर्भे पोलिसांनी अटक देखील केली होती. त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

हा शिक्षक मुलींना संगणक शिकवत असताना अश्लील चाळे करत असल्याचा आरोप होता. मुलींनी शिक्षकांना हा प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.

संबंधित बातम्या : 

Drugs Case | करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, 2019 मधील ‘त्या’ व्हिडिओवर उत्तर द्यावे लागणार!

Karthik Aryan | यूट्यूबच्या सीईओने अभिनेता कार्तिक आर्यनचे केले कौतुक!

(Pakhwaj musician Pandit Ravi Shankar Upadhyay arrested)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.