पहिल्या पत्नीवर मानसिक, शारीरिक अत्याचार, दोन मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याने थाटला दुसरा संसार
Actor Life : पहिल्या पत्नी मानसिक, शारीरिक अत्याचार, दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्याला पत्नीला दिला घटस्फोट, आता थाटला दुसरा संसार... खुद्द अभिनेत्याने सोशल मीडियावर केलेत फोटो पोस्ट, अनेकांना अभिनेत्याला नव्या आयुष्याच्या दिल्या शुभेच्छा तर अनेकांनी केलं ट्रोल...
झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी फक्त त्यांच्या कामामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. आपल्या आवडतीच्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात काय सुरु आहे, याबाबद जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचलेली असते. सोशल मीडियावर सेलिब्रिटींना स्टॉक करणं देखील सोपं झालं आहे. काही सेलिब्रिटी स्वतःच्या त्यांच्या आयुष्यातील चांगल्या – वाईट घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात. सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देत दुसरा संसार थाटला. अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता फिरोज खान आहे.
फिरोज खान याने दुसरं लग्न केलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याने नव्या नवरीसोबत काही खास फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट केले आहेत. दुसऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘माझ्या आयुष्यात तुझं स्वागत आहे… गॉर्जियस…’ सध्या फिरोज याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
फोटोंमध्ये अभिनेता आनंदी दिसत आहे. पण अनेकांनी फिरोज याला ट्रोल देखील केलं आहे. फिरोज याच्या पहिल्या पत्नीने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. फिरोज याच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न 2018 मध्ये सईदा अलीजा फातिमा रझा हिच्यासोबत कुटुंबियांच्या पसंतीने झालं होतं. लग्नानंतर 3 मे 2019 मध्ये अभिनेत्याने जगात पहिल्या मुलाचं स्वागत केलं.
दरम्यान, 2020 मध्ये अलीजा आणि फिरोज विभक्त होत असल्याच्या चर्चांनी जोर धरला. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अलीजा हिने 14 फेब्रुवारी 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील दोघांमधील वाद मिटले नाहीत. अखेर अलीजा – फिरोज यांनी 2022 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटादरम्यान अलीजा हिने पती फिरोज याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिनेत्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले आहेत.. असे आरोप फिरोज याच्यावर करण्यात आले होते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फिरोज याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
फिरोज याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने ‘बिखरा मेरा नसीब’, ‘खुदा और मोहब्बत 3’, ‘ऐ-मुशत-ए-खाक’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचे व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत असतात. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.