Chandrayaan 3 | ‘आम्हाला युद्धे आणि षड्यंत्रांसाठी…’, भरताच्या विजयानंतर पाकिस्तानी अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य
Chandrayaan 3 | चांद्रयान - 3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर पाकिस्तानी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, भारत देशाचं कौतुक करत पाकिस्तानची काळी बाजू आणली समोर... सध्या सर्वत्र अभिननेत्याच्या वक्तव्याची चर्चा...
मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : भारत देशात सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे, कारण २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान – 3 नं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं आणि देशाने शिरपेचात एक मानाचा तुरा वैज्ञानिकांनी रोवला आहे. चांद्रयान – 2 च्या अपयशानंतर फक्त भारत देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान – 3 वर होतं… २३ ऑगस्ट रोजी शेवटचे पंधरा मिनिटं वैज्ञानिकांसाठी हृदयाचा ठोका चुकवणारी होती… अखेर बुधवारी चांद्रयान – 3 नं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं.. हा क्षण देशासाठी एक ऐतिहासिक क्षण होता आणि राहिल.. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत देश पहिला देश ठरला आहे. चांद्रयान – 3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून वैज्ञानिकांना शुभेच्छा देत होते. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत देश पहिला देश ठरल्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) चं जगभरातून कौतुक होत आहे. एवढंच नाही तर, पाकिस्तानी कलाकार (Pakistani Actors On Chandrayaan 3) देखील भारताला शुभेच्छा देत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताला शुभेच्छा देत असताना पाकिस्तानी कलाकारांनी त्यांच्या देशाची काळी बाजू समोर आणली आहे.
इसरो चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण भारताचं जगभरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. दरम्यान, अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत, ज्यात त्यांनी भारताच्या यशावर आनंद तर व्यक्त केलाच पण पाकिस्तानच्या स्थितीबद्दल खंत आणि वेदनाही व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र पाकिस्ताना कालाकारांनी चांद्रयान-3 मोहिमेवर केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
पाकिस्तानी अभिनेता फरहान सईद म्हणाला, ‘भारत स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षी चंद्रावर पोहोचला आहे. पाकिस्तानचं भवितव्य आणि देशाची वाटचाल कोणत्या दिशेने जात आहे.. या विचाराने त्रस्त आहोत. पाकिस्तानला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर आम्हाला बोलण्याची परवानगी नाही. पाकिस्तानमध्ये आम्हाला युद्ध आणि षड्यंत्रांसाठी प्रोत्साहन दिलं जातं.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘एक सच्चा पाकिस्तानी असल्याच्या नात्याने मी आज सांगतो की, आम्ही जे काही करत आहोत ते योग्य नाही…’ महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फरहान सईद याच्या धक्कादायक वक्तव्यावर अनेक पाकिस्तानी नागरिक सहमत आहेत. फक्त फरहान सईद नाही तर एका पाकिस्तानी अभिनेत्रीने देखील यावर वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी म्हणाली, ‘आज खरच आमची मान शरमेने झुकत आहे. भारत कुठे पोहोचला आहे आणि आपण देशातील कायदा आणि संविधान सुरळीत करू शकत नाही. चंद्रावर पोहोचण्यासाठी पाकिस्तानला आणखी दोन – तीन दशक लागू शकतात…’ असं म्हणत अभिनेत्रीने खंत व्यक्त केली आहे.