वयामध्ये इतकं अंतर…करीना कपूरचा मुलगा बनण्याची इच्छा व्यक्त करताच भडकले फॅन्स

एका अभिनेत्याने करीना कपूरच्या वयाची खिल्ली उडवल्याने तिचे चाहते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संबंधित अभिनेत्याला करीनासोबत कोणती भूमिका साकारायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

वयामध्ये इतकं अंतर...करीना कपूरचा मुलगा बनण्याची इच्छा व्यक्त करताच भडकले फॅन्स
करीना कपूर, खाकन शाहनवाजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 10:32 AM

अभिनेत्री करीना कपूरने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘जब वी मेट’, ‘गुडन्यूज’, ‘क्रू’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘उडता पंजाब’, ‘बजरंगी भाईजान’, ‘बॉडीगार्ड’, ‘गोलमाल 3’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही करीना तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्यासोबत काम करण्याची इच्छा अनेक मोठमोठ्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. मात्र अशातच एका पाकिस्तानी अभिनेत्याने करीनाविषयी केलेल्या वक्तव्यावरून तिचे चाहते चांगलेच भडकले आहेत. या अभिनेत्याचं नाव खाकन शाहनवाज असं असून त्याने करीनासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र तिच्यासोबतच्या चित्रपटात त्याला हिरो म्हणून नाही तर तिच्या मुलाच्या भूमिकेत त्याला काम करायचं आहे. करीनाच्या वयावरून अशा पद्धतीची मस्करी केल्याने तिचे चाहते भडकले. त्यांनी शाहनवाजला जोरदार ट्रोल केलंय.

जियो उर्दूच्या एका टीव्ही शोमध्ये जेव्हा एका चाहत्याने अभिनेता खाकन शाहनवाजला विचारलं की करीना कपूरसोबत जर त्याला काम करण्याची संधी मिळाली तर तो कोणत्या प्रकारचा चित्रपट करणार? त्यावर तो मस्करीत उत्तर देतो की, अशी भूमिका जी करीनाच्या चाहत्यांना पसंत पडणार नाही. याविषयी तो पुढे म्हणतो, “जर मला संधी मिळाली तर मी ऑनस्क्रीन तिच्या मुलाची भूमिका साकारेन. कारण करीना आणि माझ्या वयात बरंत अंतर आहे.” अभिनेत्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

करीनाला हा कोण आहे हेसुद्धा माहीत नसेल, मी स्वत: कधीच याचं काम पाहिलं नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘पाकिस्तानी अभिनेत्यांना भारतात आम्ही काम करू देणार नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. खाकन शाहनवाज हा 27 वर्षीय पाकिस्तानी अभिनेता आहे. त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे साडेतीन लाख फॉलोअर्स असून त्याने काही रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला आहे. तर दुसरीकडे 44 वर्षीय करीना कपूरने 2000 मध्ये अभिनयक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. बॉलिवूडमधील ती आघाडीची आणि यशस्वी अभिनेत्री आहे. करीना आणि खाकनच्या वयात जवळपास 16 वर्षांचं अंतर आहे.

करीनाने 2000 मध्ये ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी आजवर तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘कभी खुशी कभी गम’, ‘जब वी मेट’, ‘सिंघम अगेन’, ‘थ्री इडियट्स’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘अंग्रेजी मीडियम’ हे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले आहेत.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.