सानिया मिर्झा करणार दुसरे लग्न? पाकिस्तानी अभिनेत्याने थेट म्हटले, आता..
सानिया मिर्झा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. मात्र, सानिया मिर्झा हिने तिच्या आणि शोएब मलिकच्या घटस्फोटावर काहीच भाष्य केले नाहीये. सानिया मिर्झा ही सध्या तिच्या कामावर लक्ष देताना दिसत आहे. सानिया मिर्झाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने सोशल मीडियावर सना जावेद हिच्यासोबतच्या लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. 2010 मध्ये शोएब मलिकचे सानिया मिर्झासोबत लग्न झाले. या लग्नानंतर सानिया मिर्झा भारत सोडून दुबईत शिफ्ट झाली. मात्र, अचानक शोएब मलिक याने तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोएब मलिक याचे विवाहबाह्य संबंध असल्याने सानिया मिर्झा हिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच करण्यात आला. मात्र, शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल सानियाने काहीच भाष्य केले नाहीये.
शोएब मलिक याने सानिया मिर्झासोबत घटस्फोट झाल्यानंतर तिसरे लग्न देखील करून टाकले आणि तो सध्या हनिमूनवर आहे. मात्र, दुसरीकडे शोएबसोबत घटस्फोट होऊन काही महिने झाले तरीही सानिया मिर्झा ही सिंगलच आहे. आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दल सानिया मिर्झा हिने अजूनही काहीच भाष्य केले नाही. आता थेट एक पाकिस्तानी अभिनेत्यानेच सानिया मिर्झाला मोठा सल्ला दिलाय.
सानिया मिर्झा हिला दुसरे लग्न करण्याचा सल्ला पाकिस्तानी अभिनेत्याने दिलाय. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी शोमधील एक व्हिडीओ आणि काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी शोएब मलिकने तिसरे लग्न केले तर आता सानिया मिर्झाने देखील दुसरे लग्न करावे असे, त्या अभिनेत्याने म्हटले आहे.
पाकिस्तानी अभिनेता नबील जफर याने म्हटले की, जर कोणत्याही महिलेचा घटस्फोट झाला तर तिने नक्कीच दुसरे लग्न करायला हवे. एका महिलेचे आयुष्य एकाच व्यक्तीवर संपू शकत नाही. आपल्याला एक जीवनसाथी असणे आवश्यक आहे. आता लोकांना या पाकिस्तानी अभिनेत्याने दिलेला सल्ला अजिबातच आवडला नाहीये.
अनेक लोक यानंतर भडकले आहेत, अनेकांचे म्हणणे आहे की सानिया मिर्झाच्या पर्सनल लाईफबद्दल कमीत कमी भाष्य करावे. एकाने तर थेट म्हटले की, सानिया मिर्झाने तुम्हाला तिने काय करावे आणि काय नाही, यासाठी सल्ला मागितला आहे का? तिने लग्न करावे किंवा नाही तो तिचा निर्णय आहे. सानिया मिर्झा सध्या तिच्या कामावर लक्ष्य केंद्रीत करताना दिसत आहे.