Shah Rukh Khan | ‘शाहरुखला अभिनय येत नाही, तो हँडसमसुद्धा नाही’; अभिनेत्रीच्या टीकेवरून चाहते संतापले

महनूरची ही मुलाखत चांगलीच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'ही काहीही बडबडतेय, शाहरुखसारखा अभिनेता कोणताच नाही', असं एकाने लिहिलं. तर 'तू चुकीची आहेत. तुझ्या मताने आम्हाला काही फरक पडत नाही', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

Shah Rukh Khan | 'शाहरुखला अभिनय येत नाही, तो हँडसमसुद्धा नाही'; अभिनेत्रीच्या टीकेवरून चाहते संतापले
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 1:03 PM

लाहौर : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचे चाहते केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. देशाबाहेरील चाहत्यांकडून शाहरुखला कायमच भरभरून प्रेम मिळालं. त्याच्या चित्रपटांना आणि भूमिकांना चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. मात्र नुकत्याच एका अभिनेत्रीने शाहरुखबद्दल अशी प्रतिक्रिया दिली आहे, जे ऐकून त्याचे चाहते संतापले आहेत. या अभिनेत्रीने केवळ त्याच्या दिसण्यावरूनच नाही तर अभिनयावरूनही नकारात्मक टिप्पणी केली आहे. ही अभिनेत्री पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीतील असून तिचं नाव महनूर बलोच असं आहे.

महनूर म्हणाली, “शाहरुख खानचं व्यक्तीमत्त्व चांगलं आहे, पण तुम्ही जर ब्युटी पॅरामीटरच्या हिशोबाने त्याच्याकडे पाहिलंत तर त्यात तो फिट बसत नाही. फक्त त्याचं व्यक्तिमत्त्व आणि ऑरा इतका मजबूत आहे की तो इतरांना आवडू लागतो. त्याच्या ऑरा खूप चांगला आहे. मात्र असे अनेक सुंदर लोक आहेत ज्यांच्याकडे इतरांना आकर्षित करणारा ऑरा नसतो. त्यामुळे लोकांचं त्यांच्याकडे लक्ष वेधलं जात नाही.”

महनूर फक्त इतक्यावरच थांबली नाही तर ती पुढे म्हणाली, “शाहरुखबद्दल माझं असं मत आहे की त्याला अभिनय येत नाही. तो चांगला बिझनेसमॅन आहे, त्याला हे खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे की मार्केटिंग कसं केलं जातं? कदाचित त्याचे चाहते आणि इतर काही लोक माझ्या या मताशी सहमत नसतील, पण ठीक आहे. त्याचं व्यक्तीमत्त्व उत्तम आहे. मात्र असे अनेक अभिनेते आहेत, जे त्याच्याइतके यशस्वी नाहीत.”

हे सुद्धा वाचा

महनूरची ही मुलाखत चांगलीच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ही काहीही बडबडतेय, शाहरुखसारखा अभिनेता कोणताच नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू चुकीची आहेत. तुझ्या मताने आम्हाला काही फरक पडत नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

दरम्यान शाहरुख खानला लॉस एंजिलिसमध्ये शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचं वृत्त कळताच चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. आगामी एका प्रोजेक्टसाठी शूटिंग सुरू असताना त्याच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती होती. नाकातून रक्तस्राव होऊ लागल्याने त्याला तातडीने तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नाकावर सर्जरी झाल्याचं म्हटलं गेलं होतं. या चर्चांदरम्यान नुकतंच शाहरुखला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. बुधवारी पहाटे शाहरुख मुंबईत परतला आणि यावेळी तो नेहमीप्रमाणे फिट अँड फाइन दिसत होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.