अभिनेत्री हनिया आमीरच्या इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान चाहत्याचे घृणास्पद कृत्य, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

हनिया आमिर एक लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. ती दररोज आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते आणि दररोज चर्चेत राहत असते. मात्र, असे काय झाले की, नेहमी हसत हसत आणि 'फनी स्टोरी' पोस्ट करणारी हनिया (Hania Amir) अस्वस्थ होऊन अशा सर्व पोस्ट करत आहे?

अभिनेत्री हनिया आमीरच्या इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान चाहत्याचे घृणास्पद कृत्य, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
हनिया आमीर
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 4:27 PM

इस्लामाबाद : ‘समाजात आजही स्त्रियांचा द्वेष केला जातो. स्त्रियांचा द्वेष करणाऱ्या या जगात निरागसपणाचे दुहेरी निकष लावले जाते. येथे इतरांच्या मताचा आदर केला जात नाही. परंतु, जेव्हा एखाद्या स्त्रीचा विचार केला जातो, तेव्हा तिरस्कार करणाऱ्या माणूसाचेही नेहमीच कौतुक केले जाते, परंतु जर एखादी स्त्री जेव्हा असे करते, तेव्हा तिचा तिरस्कारपूर्वक विचार केला जातो. या जगात आपल्या प्रियजनांवर भरपूर प्रेम करणारी आणि त्यांच्याशी बोलणारी स्त्री चुकीची वाटते. परंतु, एका स्त्रीच्या फोटोसमोर हस्तमैथुन करणाऱ्या पुरुषाचा व्हिडीओ मात्र नेटवर व्हायरल होतो’, हे आम्हाला नाही तर पाकिस्तानी अभिनेत्री (Pakistani Actress Hania Amir) म्हणत आहे (Pakistani Actress Hania Amir breaks down in tears after facing sexual harassment during Instagram live session).

हे शब्द पाकिस्तानी अभिनेत्री हनिया आमीर (Hania Amir) हिचे आहेत, जिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत हे लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये हनिया खूप दुखी दिसत आहे. दु:खी अवस्थेत तिच्या बहिणीशी बोलताना, सतत आपले अश्रू पुसत आहे.

कोण आहे हनिया आमीर?

हनिया आमिर एक लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आहे. ती दररोज आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते आणि दररोज चर्चेत राहत असते. मात्र, असे काय झाले की, नेहमी हसत हसत आणि ‘फनी स्टोरी’ पोस्ट करणारी हनिया अस्वस्थ होऊन अशा सर्व पोस्ट करत आहे?

काय आहे प्रकरण?

गेल्या शुक्रवारीच हनियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लाईव्ह सेशन करत, चाहत्यांशी संवाद साधत होती. दरम्यान, त्या लाईव्ह सेशनदरम्यान एका चाहत्याने तिच्या फोटोसमोर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.

हे सर्व इतके विचित्र, लाजिरवाणे आणि अविश्वसनीय होते की हनियाच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले आणि तिने लगेचच ते लाईव्ह सेशन बंद केले. त्यानंतर लगेचच, कोणीतरी या लाईव्ह सेशनचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, जो काही तासांच्या आतच खूप व्हायरल झाला.

तथापि, अद्याप या व्हिडिओची पुष्टी होणे बाकी आहे. काही वापरकर्त्यांच्या मते, हा व्हिडीओ बनावट आहे आणि एडीट केलेला आहे. परंतु, हे प्रकरण येथेच संपत नाही, या प्रकरणात एकच नाही, तर दुसरा एक व्हिडीओ देखील यात सामील आहे (Pakistani Actress Hania Amir breaks down in tears after facing sexual harassment during Instagram live session).

आणखी एक व्हिडीओ व्हायरल

हनियाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, ज्यात तिने गायक हसन रहीम यांचे ‘तेरी आरझू’ गाणे गाताना पाकिस्तानी दिग्दर्शक वजाहत रऊफ यांचे पुत्र आशिर वजाहाट आणि न्याल वजाहत यांना मिठी मारली आहे.

विशेष म्हणजे, हनिया अनेकदा दिग्दर्शक वजाहत यांच्या मुलांना आणि त्यांच्या पत्नीला आपल्या पोस्टमध्ये ‘फॅमिली’ म्हणून संबोधते आणि स्वतःलाही या कुटुंबाचा एक भाग मानते. या व्हिडीओसह, ती म्हणाली होती की, “आपल्या भावाला 101 तापात असताना असे हाताळा.”

सोशल मीडियावरील बरेच वापरकर्ते हनिया आमीरच्या लैंगिक छळाचा निषेध करत असताना, कित्येक वापरकर्ते हनियावर “निर्लज्जपणा आणि अश्लीलता पसरवणारी” असा आरोप करत, वजाहत रऊफच्या मुलांबरोबर बनवलेला व्हिडीओ व्हायरल करत आहेत. या दोन व्हिडीओंमुळे गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या टॉप ट्रेंडमध्ये हनियाचा समावेश झाला आहे.

(Pakistani Actress Hania Amir breaks down in tears after facing sexual harassment during Instagram live session)

हेही वाचा :

Dilip Kumar Health Update | दिलीप कुमारांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पत्नी सायरा बानो यांच्यासह घरी रवाना

Video | अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स, व्हिडीओ पाहून बॉलिवूडकरही अवाक्!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.