Virat Kohli वर पाकिस्तानी अभिनेत्री फिदा; कारण ऐकून तुम्हीही पडाल प्रेमात!

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनीही त्याच्यावर शुभेच्छांचा, कौतुकाचा वर्षाव केला. विराट कोहलीच्या या विक्रमी शतकादरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री मथिराची (Mathira) एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat Kohli वर पाकिस्तानी अभिनेत्री फिदा; कारण ऐकून तुम्हीही पडाल प्रेमात!
Virat Kohli वर पाकिस्तानी अभिनेत्री फिदाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 3:03 PM

आशिया चषकात टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर दणदणीत विजय नोंदवला. या विजयाचा हिरो विराट कोहली (Virat Kohli) ठरला. विराटने नाबाद 122 धावांची खेळी केली. जवळपास 33 महिन्यांनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक (Century) झळकावलं. या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा झाली. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनीही त्याच्यावर शुभेच्छांचा, कौतुकाचा वर्षाव केला. विराट कोहलीच्या या विक्रमी शतकादरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री मथिराची (Mathira) एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मथिराने विराट कोहलीला सॅल्यूट करतानाचा व्हिडिओ शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहली या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत म्हणाला होता, “जेव्हा तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे क्रिकेट खेळता, तेव्हा देणारा हा वरचाच असतो. कितीही हातपाय मारले तरी जेव्हा त्याला द्यायचं असतं, तेव्हाच तो देतो. मी माझं आयुष्य असंच जगतो. जोपर्यंत मला खेळता येईल, तोपर्यंत मी असंच खेळेन.” या व्हिडीओवर मथिराने लिहिलं, ‘म्हणूनच मी त्याची चाहती आहे.’

हे सुद्धा वाचा

कोण आहे मथिरा मोहम्मद?

मथिरा मोहम्मद ही पाकिस्तानी-झिम्बाब्वे मॉडेल आहे. मथिरा ही पाकिस्तानी असली तरी तिचा जन्म हरारे इथं झाला. मथिरा एक मॉडेलिंग, डान्सर, टेलिव्हिजन होस्ट, गायिका आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक टेलिव्हिजन शोज होस्ट केले आहेत. तसंच ती काही म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे. ‘मैं हूँ शाहिद आफ्रिदी’ या चित्रपटातील आयटम साँगमुळे ती प्रकाशझोतात आली.

भारत असो किंवा पाकिस्तान.. अनेक कलाकार सध्या क्रिकेटसंदर्भातील पोस्टमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहचा व्हिडीओ शेअर केला होता. टेलिव्हिजन अभिनेत्री सुरभी ज्योतीनेही नसीमबद्दल ट्विट केलं होतं. त्यानंतर आता मथिराने विराटचं कौतुक केलं आहे. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतकं पूर्ण केली आहेत. संपूर्ण भारतीयांकडून हा जल्लोष साजरा केला गेला.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.