कित्येक दिग्दर्शकांनी शेजारी झोपायला लावलं, पाकिस्तानच्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, झगमगत्या दुनियेचं भयान वास्तव समोर

पाकिस्तानी अभिनेत्री सबा बुखारी हीने आपल्याला देखील कास्टिंग काऊचला सामोरे जावं लागल्याचा खुलासा केला आहे. सबाने जरी अत्याचार झाल्याचं सांगितलं असलं तरी तिने कोणत्याही दिग्दर्शकाचं नाव घेतलेलं नाही (Pakistani Actress Saba Bukhari told her experience about casting couch)

कित्येक दिग्दर्शकांनी शेजारी झोपायला लावलं, पाकिस्तानच्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, झगमगत्या दुनियेचं भयान वास्तव समोर
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 4:02 PM

लाहोर : सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. या अभिनेत्रीने पाकिस्तानी चित्रपटसृष्टी म्हणजेच लॉलीवूडमध्ये काम करत असताना कास्टिंग काऊचचा कशाप्रकारे सामना करावा लागला यावर भाष्य केलंय. त्यामुळे जगभरात तिचं नाव सध्या चर्चेत आहे. या पाकिस्तानी अभिनेत्रीचं नाव सबा बुखारी असं आहे. तिच्या याच खुलाश्याबाबत आज आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत (Pakistani Actress Saba Bukhari told her experience about casting couch).

नेमकं प्रकरण काय?

हॉलिवूडनंतर, बॉलिवूडमध्येही मीटू चळवळ प्रचंड गाजली. अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तन आणि लैंगिक शोषणाबद्दल खुलेआम भूमिका मांडली. बॉलिवूडनंतर पाकिस्तानच्या चित्रपटसृष्टीतही अनेक दिग्गज अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अत्याचारावर भाष्य केलं. त्यानंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा बुखारी हीने बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला देखील अशा घाणेरड्या कास्टिंग काऊचला सामोरे जावं लागल्याचा खुलासा केला. सबाने जरी अत्याचार झाल्याचं सांगितलं असलं तरी तिने कोणत्याही दिग्दर्शकाचं नाव घेतलेलं नाही.

सबा बुखारीने नेमकं काय सांगितलं?

सबा बुखारी या अभिनेत्रीला एक भूमिका मिळाल्यानंतर एका दिग्दर्शकाने शेजारी झोपायची ऑफर दिली होती. त्याबाबत तिने मुलाखतीत सांगितलं. “मला रोल मिळाल्यानंतर एक फोन आला. त्यांनी मला सांगितलं, रोल तर तुम्हाला मिळाला आहे. आम्ही तुम्हाला चांगली भूमिका आणि पैसेही देऊ. पण त्याबदल्यात आम्हाला तुमच्याकडून काहीतरी हवंय. मला वाटलं त्यांना त्याबदल्यात पैसे हवे असतील. त्यामुळे मी त्यांना पैसे हवे असतील तर घ्या, असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी नाही असं म्हटलं. नंतर त्यांनी मला शेजारी झोपण्याबाबत सांगितलं. माझ्या तर पायाखलची जमीनच सरकली. मी लगेच फोन कट केला”, असं सबाने मुलाखतीत सांगितलं.

सबाची इन्स्टाग्राम पोस्ट

मुलाखतीआधी सबाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरबी याबाबत भाष्य केलं होतं. चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शकांनी कशाप्रकारे कास्टिंग काऊच करुन तिचं मनौधैर्य खचवलं, याबाबत तिने भाष्य केलं होतं (Pakistani Actress Saba Bukhari told her experience about casting couch).

तिच्या पोस्टबद्दल तिला बीबीसीच्या मुलाखतीत विचारण्यात आलं त्यावेळी तिने त्या पोस्टमुळेच आपल्या पाठिंबा मिळाल्याचं सांगितलं. “माझ्या इन्स्टाग्राम अकाउंट जास्त फोलोअर्स नव्हते. त्यामुळे माझी जास्त रिच नव्हती. मात्र, माझ्या त्या पोस्टनंतर मला अनेकांनी पाठिंबा दिला. मला तर समजतच नव्हतं की लोक मला एवढा पाठिंबा कसा देत आहेत. पण मी खूश होती. मी सोशल मीडिया जास्त सक्रीय राहत नाही. पण कुणीतरी मला सांगितलं होतं की, काम मिळावं यासाठी सोशल मीडियावर सक्रीय राहायला हवं”, असं रोखठोक उत्तर तिने दिलं.

हेही वाचा : ‘पुण्याच्या आयुक्तपदी असताना रश्मी शुक्ला बिल्डरांकडून खंडणी गोळा करायच्या’ 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.