बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणं मोठी चूक? पाकिस्तानी क्रिकेटरने अखेर सोडलं मौन

रीना रॉय यांचं शत्रुघ्न सिन्हा यांच्याशीही नाव जोडलं गेलं होतं. पण त्यांचं प्रेम लग्नाच्या नात्यात रूपांतरित होऊ शकलं नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि रीना यांनी मोहसिन खान यांच्याशी लग्न केलं.

बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणं मोठी चूक? पाकिस्तानी क्रिकेटरने अखेर सोडलं मौन
Mohsin Khan and Reena RoyImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 1:04 PM

लाहौर : बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय यांचा पूर्वाश्रमीचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान यांची एक मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत त्यांनी उत्तर दिलं की रीना रॉय यांच्याशी विभक्त होण्याबद्दल कोणताच पश्चात्ताप नाही. त्यांनी असंही सांगितलं की लग्नापूर्वी त्यांनी रीना रॉय यांचा कोणताच चित्रपट पाहिला नव्हता. रीना यांच्या चेहऱ्यावर, सौंदर्यावर नाही तर त्यांच्या मनावर प्रेम केलं होतं, अशी कबुली त्यांनी या मुलाखतीत दिली. इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चन यांच्याविषयीही त्यांनी वक्तव्य केलं.

1990 मध्ये झाला घटस्फोट

मोहसिन खान आणि रीना रॉय यांचं लग्न 1983 मध्ये झालं होतं. लग्नाच्या सात वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर आधी मोहसिन यांना मुलगी सनमचा ताबा मिळाला. मात्र त्यांनी दुसरं लग्न केल्यानंतर मुलीचा ताबा रीना रॉय यांच्याकडे आला. मोहसिन सध्या कराचीमध्ये राहतात. तर रीना या त्यांच्या मुलीसोबत भारतात राहतात.

“लग्नाचा पश्चात्ताप नाही”

मोहसिन यांना या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की त्यांना भारतीय अभिनेत्रीशी लग्न केल्याचा पश्चात्ताप आहे का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, “मला काहीच पश्चात्ताप नाही. मी एका व्यक्तीशी लग्न केलं होतं. ती कुठून आहे याचा विचार मी केला नव्हता. नंतर मी पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय घेतला होता. मी खेळण्यासाठी इंग्लंडला गेलो होतो. मात्र मला पाकिस्तानातच राहायचं होतं.”

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन यांच्याविषयी काय म्हणाले?

रीना रॉय यांच्या सौंदर्यावर ते फिदा होते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “लग्नाआधी मी त्यांचा कोणताच चित्रपट पाहिला नव्हता. यावर कोण विश्वास ठेवणार नाही, पण मी चित्रपट पाहत नाही. फारच कमी चित्रपट मी पाहिले आहेत. अमिताभ बच्चन यांचा एखादा सीन दिसला तर मी थांबून बघतो. पण त्याशिवाय मला चित्रपटांमध्ये फार रस नाही. मी रीना रॉय यांच्या सौंदर्यावर नाही तर मनावर फिदा होतो.”

रीना रॉय यांचं शत्रुघ्न सिन्हा यांच्याशीही नाव जोडलं गेलं होतं. पण त्यांचं प्रेम लग्नाच्या नात्यात रूपांतरित होऊ शकलं नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि रीना यांनी मोहसिन खान यांच्याशी लग्न केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.