Celina Jaitly | ‘बापलेकासोबत तिचे शारीरिक संबंध..’ सेलिना जेटलीवरील टीकेचं प्रकरण पोहोचलं परराष्ट्र मंत्रायलयात

सेलिनाने 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या करिअरमधल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची निर्मिती फिरोज खान यांनी केली होती आणि त्यात त्यांचा मुलगा फरदीन खानने भूमिका साकारली होती. पाकिस्तानी समीक्षकाच्या टीकेनंतर सेलिनाने ट्विट करत त्याची शाळा घेतली होती.

Celina Jaitly | 'बापलेकासोबत तिचे शारीरिक संबंध..' सेलिना जेटलीवरील टीकेचं प्रकरण पोहोचलं परराष्ट्र मंत्रायलयात
Firoz Khan, Celina Jaitly and Fardeen KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 10:58 AM

नवी दिल्ली | 31 जुलै 2023 : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सेलिना जेटलीवर एका पाकिस्तानी चित्रपट समीक्षकाने खालच्या पातळीची टीका केली होती. उमैर संधू नावाच्या या समीक्षकाने सेलिनाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला होता. ‘सेलिना ही अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिचे पिता (फिरोज खान) आणि पुत्र (फरदीन खान) यांच्याशी शारीरिक संबंध होते’, असं त्याने लिहिलं होतं. त्यावर सेलिनाने ट्विटरवर सडेतोड उत्तर दिलं होतं. आता सेलिनाने खुलासा केला आहे की तिने याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायुक्तांकडून याप्रकरणी उत्तर मागितलं आहे.

सेलिनाने 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या करिअरमधल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची निर्मिती फिरोज खान यांनी केली होती आणि त्यात त्यांचा मुलगा फरदीन खानने भूमिका साकारली होती. पाकिस्तानी समीक्षकाच्या टीकेनंतर सेलिनाने ट्विट करत त्याची शाळा घेतली होती. ‘प्रिय संधू, अशा प्रकारची पोस्ट लिहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुरुष असण्यावर अधिक अभिमान वाटत असेल. तुम्हाला तुमच्या नपुंसकतेवरचा उपाय मिळाला असेल. पण तुमचा हा आजार डॉक्टरांच्या उपचारानेही बरा होऊ शकतो. कधीतरी प्रयत्न करून नक्की बघा. ट्विटरने यांच्याविरोधात त्वरित कारवाई करावी’, अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला होता. आता याप्रकरणी पुढच्या कारवाईबाबत तिने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

‘माझ्यावर खालच्या पातळीची टीका करणारा गुन्हेगार सोशल मीडियावर सतत त्याचं लोकेशन बदलतोय. त्यामुळे पाकिस्तानातून मला कायदेशीर कारवाईसाठी कोणता मार्ग सापडला नाही. अखेर मी भारतातील राष्ट्रीय महिला आयोगाकडे याप्रकरणी मदत मागितली. आयोगाने माझ्या तक्रारीची दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहसचिवांना (PAI विभाग) उद्देशून पत्र लिहिलं. मंत्रालयाने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं असून या घटनेची त्वरित चौकशी आणि कारवाईची मागणी करत नवीन दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तांकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे’ अशी माहिती सेलिनाने दिली.

‘माझ्यासाठी हा केवळ माझ्या चारित्र्यावरील हल्ल्याविरोधातचा लढा नव्हता. तर हा हल्ला माझ्या मातृत्वावर, कुटुंबावर आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझे गॉडफादर आणि गुरू फिरोज खान यांच्यावर होता. ते माझे मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी मला दिलेल्या प्रेम, आदर आणि करिअरमधील संधीबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन. मी भारतीय सैन्यातील युद्ध नायकाची मुलगी आहे. या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानला जावं लागलं असतं तरी मी गेले असते. याप्रकरणी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे’, असंही तिने स्पष्ट केलं.

सेलिनाने या ट्विटच्या अखेरीस भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत. ‘ही कारवाई सुरू करून त्यांनी प्रत्येक भारतीय स्त्रीची मान अभिमानाने उंचावली आहे. एक भारतीय स्त्री असल्याचा मला अभिमान आहे. वडिलांसह माझ्या कुटुंबातील चार पिढ्यांनी आपलं रक्त या देशासाठी दिलं. आज ते या जगात नसताना मला माझ्या राष्ट्राची मुलगी म्हणून वागणूक मिळाल्याचा आनंद वाटतो’, अशा शब्दांत तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.