Esra Bilgic: ‘लाज वाटली पाहिजे तुला’ म्हणत पाकिस्तानी युजर्सनी अभिनेत्रीला ‘ब्रा’च्या जाहिरातीवरून केलं ट्रोल

प्रसिद्ध टर्किश अभिनेत्री (Turkish actor) इस्रा बिलगिच (Esra Bilgiç) तिच्या एका जाहिरातीमुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. इस्राने एका इनर गारमेंट कंपनीची जाहिरात केली असून या जाहिरातीत तिने 'ब्रा'चं प्रमोशन केलं आहे. यावरूनच पाकिस्तानी नागरिक तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

Esra Bilgic: 'लाज वाटली पाहिजे तुला' म्हणत पाकिस्तानी युजर्सनी अभिनेत्रीला 'ब्रा'च्या जाहिरातीवरून केलं ट्रोल
turkish actress Esra Bilgic Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 5:06 PM

प्रसिद्ध टर्किश अभिनेत्री (Turkish actor) इस्रा बिलगिच (Esra Bilgiç) तिच्या एका जाहिरातीमुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. इस्राने एका इनर गारमेंट कंपनीची जाहिरात केली असून या जाहिरातीत तिने ‘ब्रा’चं प्रमोशन केलं आहे. यावरूनच पाकिस्तानी नागरिक तिला जोरदार ट्रोल करत आहेत. इस्राने ‘एर्तरुल गाजी’ (Ertuğrul) या लोकप्रिय शोमध्ये राणीची (हलीमे सुल्तान) भूमिका साकारली होती. 36 सेकंदांच्या या जाहिरातीत तिने ‘ब्रा’वर ब्लेझर परिधान करत इनर गारमेंटची जाहिरात केली आहे. पाकिस्तानी नेटकऱ्यांना ही गोष्ट पचनी पडत नसून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. चार दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला 16 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘एर्तरुल गाजी’मध्ये इस्राला नेहमीच प्रेक्षकांनी पूर्ण कपड्यांमध्ये पाहिलंय. असं असलं तरी रिअल आणि रिल लाईफमधील फरक समजून न घेता तिला ट्रोल केलं जातंय.

पाकिस्तानी नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

‘तुला असे कपडे परिधान करायचे होते, तर तू हलीमे यांची भूमिका साकारायला पाहिजे नव्हती’, असं एका युजरने म्हटलं. तर ‘तुला लाज वाटली पाहिजे, ही कसली जाहिरात करतेयस’, असं दुसऱ्याने लिहिलं. एकीकडे तिच्यावर टीका होत असताना काही नेटकऱ्यांनी तिच्या बाजूने प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘पाकिस्तानी युजर्सच्या वतीने मी तुमची माफी मागते’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘हलीमेच्या भूमिकेतून बाहेर पडा आणि तिला एक महिला म्हणून पहा. जाहिरातींमध्ये त्या अशा प्रकारचा पोशाख करू शकतात. यात नाराज होण्याचं कारण नाही’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने ट्रोलर्सना सुनावलं. सोशल मीडियावर ट्रोल होण्याची इस्राची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्या खासगी आयुष्यावरून तिच्यावर टीका करण्यात आली.

इस्राची वादग्रस्त ठरलेली जाहिरात-

View this post on Instagram

A post shared by Esra Bilgic (@esbilgic)

इस्राच्या जाहिरातीवरील प्रतिक्रिया-

कोण आहे इस्रा बिलगिच?

30 वर्षांची इस्रा ही प्रसिद्ध टर्किश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. टर्की आणि त्या परिसरातील ऑटोमन साम्राज्यावर आधारित ‘एर्तरुल गाजी’ या मालिकेत तिने राणीची भूमिका साकारली होती. ही मालिका पाकिस्तानात चांगलीच गाजली. ही तिच्या करिअरमधली पहिलीच भूमिका होती. 2018 मध्ये तिने चित्रपटात काम करण्यासाठी ही मालिका सोडली. इस्राने हेजतेप विद्यापिठातून पुरातनशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे. ती सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे. 2017 मध्ये तिने टर्कितील फुटबॉलपटू गोखान तोरे याच्याशी लग्न केलं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या दोन वर्षांतच तिने घटस्फोट घेतला.

हेही वाचा:

‘अभिषेक, तूच माझा उत्तराधिकारी, बस कह दिया तो कह दिया’; ट्रोलर्सना Amitabh Bachchan यांचं सणसणीत उत्तर

फोटोसाठी कायपण! प्रेग्नंट अभिनेत्रीने घातले हाय हिल्स; नेटकऱ्यांनी ट्रोल करताच म्हणाली..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.