Bigg Boss | तुम्ही पाहिलाय पाकिस्तानी ‘बिग बॉस’? घाणेरडेपणा पाहून होस्ट भडकला, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानी 'बिग बॉस'मध्ये कसं असतं वातावरण? सर्वत्र पडलेल्या वस्तू... घरातील घाणेरडेपणा पाहून होस्ट रागावला आणि...; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..

Bigg Boss | तुम्ही पाहिलाय पाकिस्तानी 'बिग बॉस'? घाणेरडेपणा पाहून होस्ट भडकला, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 11:38 AM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : भारतीय रियालिटी शोमध्ये ‘बिग बॉस’ सर्वात लोकप्रिय शो आहे. हा शो पाहणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखीस शोचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता सलमान खान शोच्या होस्टची जबाबदारी पार पाडत आहे. आतापर्यंत भारतीय ‘बिग बॉस’चे १६ सीझन पूर्ण झाले असून ‘बिग बॉस ओटीटी’चे देखील दोन भाग पूर्ण झाले आहेत. सध्या सर्वत्र बिग बॉसची चर्चा सुरु असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘बिग-बॉस’ प्रमाणेच पाकिस्तानमध्येही एक रिऍलिटी शो प्रसारित होतो. पाकिस्तानमध्ये प्रसारित होणाऱ्या शोचं नाव ‘तमाशा’ आहे. हा शो ARY Digital वर प्रसारित केला जातो. अदनान सिद्दीकी हा शो होस्ट करतो. ‘तमाशा’ शोमधील एक व्हिडीओ सोध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यामध्ये अदनान ‘बिग बॉस १३’ मध्ये ज्याप्रकारे सलमान खान याने घरातील सदस्यांना फटकारता होतं. त्याच प्रमाणे अदनान देखील ‘तमाशा’ शोमध्ये स्पर्धकांनी ओरडताना दिसत आहे. सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

‘तमाशा’ शोमधील होस्ट अदनान सिद्दीकी घरात येतो आणि घरातील अस्वच्छतेमुळे स्पर्धकांवर भडकतो. अदनान सिद्दीकी म्हणतो, ‘हे घर आहे की कबाडखाना आहे हे समजत नाहीये… इकडे-तिकडे वस्तू पडल्या आहेत… या घरात काय चाललंय ते समजत नाहीये. .. यानंतर अदनान किचनमध्ये जातो आणि म्हणतो की किमान गेल्या सीझनमध्ये गोष्टी त्यांच्या जागी होत्या.’ व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस १३’ मध्ये देखील सलमान खान याचप्रमाणे स्पर्धकांवर भडकला होता. घरात अस्वच्छता पसरवल्याबद्दल अभिनेत्याने घरातील सदस्यांना फटकारलं आणि स्वत:च्या हाताने घराची स्वच्छताही केली. एवढंच नाही तर, भाईजान याने स्वयंपाकघरात जाऊन भांडीही धुतली होती.

‘तमाशा’ शोच्या दुसरा सीझन होतोय टेलिकास्ट

पाकिस्तानचा रिऍलिटी शो ‘तमाशा’ हा डच रिअॅलिटी शो ‘बिग ब्रदर’वर आधारित आहे. शोचा पहिला सीझन २० ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाला होता. सध्या शोचा दुसरा सीझन टेलिकास्ट होत आहे. उमर शहजाद, अरुबा मिर्झा, फैजान शेख इत्यादी अनेक पाकिस्तानी स्टार्स या शोचा भाग आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.