प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल आणि संगीतकार मिथून यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. रविवारी या दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिसेप्शनला इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अगरवाल हे पलक आणि मिथूनला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
'आज हम दो सदैव के लिए एक हुए', असं कॅप्शन देत पलकने रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. रिसेप्शनसाठी पलकने लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा तर मिथूनने शेरवानी परिधान केली होती.
पलक मुच्छल ही प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. तिने विविध भाषांमधील बरीच लोकप्रिय गाणी गायली आहेत. एक था टायगर, किक, आशिकी 2, प्रेम रतन धन पायो, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, काबिल, बागी 2 यांसारख्या चित्रपटांसाठी तिने गाणी गायली आहेत.
मिथून हा यशस्वी संगीतकार आहे. 'तुम ही हो', 'सनम रे' ही त्याची गाणी विशेष गाजली. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते.