Palak Tiwari | पलक हिनेच केली श्वेता तिवारी हिची मोठी पोलखोल, आईबद्दल केला थेट ‘हा’ खुलासा

पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. पलक तिवारी हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. पलक तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. पलक तिवारी ही सोशल मीडियावर सक्रिय असते.

Palak Tiwari | पलक हिनेच केली श्वेता तिवारी हिची मोठी पोलखोल, आईबद्दल केला थेट 'हा' खुलासा
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 10:58 PM

मुंबई : पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. पलक तिवारी (Palak Tiwari) हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. पलक तिवारी ही सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात धमाल करताना दिसली. पलक तिवारी या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसली. पलक तिवारी हिच्या बाॅलिवूड (Bollywood) पर्दापणासाठी आई श्वेता तिवारी हिने खूप जास्त मेहनत घेतली. अनेक चित्रपट निर्मात्यांच्या भेटीला श्वेता तिवारी आपल्या लेकीला घेऊन गेली. शेवटी पलक तिवारी हिला सलमान खान याने चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

पलक तिवारी हिला म्हणावी तशी छाप प्रेक्षकांवर सोडण्यास यश मिळाले नाही. किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून पलक तिवारी हिच्यासोबतच शहजान गिल हिने देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. पलक तिवारी ही किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. यावेळी तिने अनेक मुलाखती देखील दिल्या.

पलक तिवारी ही सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आलीये. विशेष म्हणजे पलक तिवारी हिच्यासोबत या व्हिडीओमध्ये तिची आई श्वेता तिवारी ही दिसत आहे. पलक तिवारी हिने हा व्हिडीओ तिच्या इंस्टास्टोरीवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडला आहे. या व्हिडीओमध्ये पलक आपल्या आईसोबत मस्करी करताना दिसत आहे.

पलक तिवारी आणि श्वेता तिवारी या जिममध्ये एकसोबत गेल्याचे दिसत आहे. मात्र, पलक तिवारी या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे की, हिच्यासोबत आल्याने मी फसले. पलक तिवारी व्हिडीओमध्ये म्हणते की, मी तुम्हाला आज सांगू इच्छिते की, मी मेहनती मुलगी असून ही माझी आई खूप आळशी आहे. यामुळेच मी हिच्यासोबत जिममध्ये येत नाही.

हिला जिममध्ये आल्यावर व्यायाम करण्यापेक्षा अधिक गप्पा मारायला आवडतात. यामुळे मी फसले आहे. लेकीचे हे सर्व बोलणे ऐकून श्वेता तिवारी ही हसताना दिसत आहे. पलक तिवारी हिने एकाप्रकारे आपल्या आईची पोलखोल केली आहे. या व्हिडीओमध्ये पलक तिवारी हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. या व्हिडीओमध्ये श्वेता तिवारी जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे.

पलक तिवारी ही सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान हे बऱ्याच वेळा एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान काही दिवसांपूर्वीच एकसोबत चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये पोहचले होते. यांचे नेहमीच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.