नवाजुद्दीनची गर्लफ्रेंड होती ‘पंचायत 3’ची अभिनेत्री; ब्रेकअपनंतर नोटीस पाठवून मागितले 2 कोटी रुपये

प्राइम व्हिडीओवर लवकरच 'पंचायत' या लोकप्रिय वेब सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील एक प्रसिद्ध अभिनेत्री ही नवाजुद्दीन सिद्दिकीची एक्स गर्लफ्रेंड होती. ब्रेकअपनंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.

नवाजुद्दीनची गर्लफ्रेंड होती 'पंचायत 3'ची अभिनेत्री; ब्रेकअपनंतर नोटीस पाठवून मागितले 2 कोटी रुपये
Nawazuddin SiddiquiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 3:10 PM

प्राइम व्हिडीओवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिसऱ्या सिझनविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. तिसऱ्या सिझनमध्येही बहुतांश पहिल्या आणि दुसऱ्या सिझनचे कलाकार भूमिका साकारणार आहेत. यामध्ये बनराकसची पत्नी ‘क्रांती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनीता राजवरच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. ‘बिट्टू की मम्मी’ म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. एकेकाळी यात सुनीताचं नाव अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीशी जोडलं गेलं होतं.

नवाजुद्दीनने त्याच्या ‘ॲन ऑर्डिनरी लाइफ’ या आत्मचरित्रात सुनीतासोबतच्या नात्याचा उल्लेख केला होता. एनएसडीमध्ये शिकताना दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. हे दोघं जवळपास दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यावेळी गरीबीमुळे सुनीताने सोडल्याचं नवाजुद्दीनने त्यात लिहिलं होतं. इतकंच नव्हे तर ब्रेकअपनंतर आत्महत्येचा विचार केल्याचाही खुलासा त्याने आत्मचरित्रात केला होता. नंतर सुनीताने फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित तिची बाजू मांडली होती.

हे सुद्धा वाचा

‘मी नवाजच्या विचारांमुळे त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. तुझ्यापेक्षा गरीब तर मी होती. तू कमीतकमी स्वत:च्या घरात तरी राहत होता. मी तर मैत्रिणीच्या घरात राहून संघर्ष करत होते. हे तुला खूप चांगल्याप्रकारे माहीत आहे की आपलं नातं एका नाटकापासून सुरू झालं होतं. त्याच नाटकाच्या तिसऱ्या शोच्या आधीच आपलं नातं संपुष्टात आलं होतं. कारण मला तुझा खरा चेहरा दिसला होता. मी तुझा फोन उचलणं बंद केलं होतं, कारण मला तुझ्याबद्दल विचार करूनच किळस यायचा’, असं तिने लिहिलं होतं. इतकंच नाही तर तिने नवाजुद्दीनला कोर्टातसुद्धा खेचलं होतं. यासोबतच तिने 24 तासांच्या आत माफी आणि 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यायला सांगितली होती. मात्र हा वाद वाढल्यानंतर नवाजुद्दीनने स्पष्ट केलं की तो सुनीता राजवरबद्दल नाही तर दुसऱ्याच सुनीताबद्दल बोलत होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.