बायको करायची धुणीभांडी, पैशांसाठी अभिनेत्याने केल्या 3 नोकऱ्या, आज आहे गडगंज श्रीमंत

Struggle Life: बायकोनं धुणीभांडी करत पतीचे स्वप्न केले पूर्ण, भूक भागवण्यासाठी अभिनेता स्वतः करायचा 3 नोकऱ्या..., आज आहे गडगंज संपत्तीचा मालक, खुद्द अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष... जाणून व्हाल थक्क

बायको करायची धुणीभांडी, पैशांसाठी अभिनेत्याने केल्या 3 नोकऱ्या, आज आहे गडगंज श्रीमंत
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 3:05 PM

झगमगत्या विश्वात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी आयुष्याची सुरुवात शुन्यापासून केली. पण या संघर्षात त्यांना साथ मिळाली ती म्हणजे पत्नीची… नुकताच एका अभिनेत्याने जुन्या आठवणी ताज्या करत पत्नीने केलेल्या सहकार्याबद्दल सांगितलं आहे. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून पंजाबी सिंगर आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाल आहे. गिप्पी ग्रेवार आज झगमगत्या विश्वातील फार मोठं नाव आहे. पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अभिनेत्याने मोठा संघर्ष केला आहे.

एका मुलाखतीत गिप्पी याने बायको दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी गिप्पी ग्रोवाल याने तीन नोकऱ्या केल्या. गिप्पी म्हणाला, ‘एक काळ असा होता, जेव्हा मी तीन नोकऱ्या करायचो. पण फार काही कमाई होत नव्हती आणि पंजाबमध्ये अनेक गायक आहेत. ज्यांच्यावर कंपनीने आता गुंतवणूक करणं बंद केलं.’

‘अल्बम्स प्रचंड महागड्या झाले होते. प्रत्येक कलाकाराला सांगितलं जायचं की, तुझ्यामध्ये कौशल्य आहे, पण कंपनी गुंतवणूक कशी करेल… यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. घरुन पैसे घेण्याची तेव्हा पद्धत नव्हती. त्यामुळे स्वतः काम करुन पैसे कमवावे लागत होते. पण कठीण काळात माझ्या पत्नीने माझी साथ सोडली नाही…’

‘माझ्या बायकोने देखील 3 नोकऱ्या केल्या. कारण कॅनडामध्ये कुटुंबाची भूक भागवायची होती. त्यामुळे तिने देखील प्रचंड मेहनत घेतली. मी 3 नोकऱ्या करायचो. सकाळी मी लोकांच्या घरी न्यूजपेपर टाकायचो. त्यानंतर 8 -9 तास एका फॅक्ट्रीमध्ये काम करायचो… प्रचंड कठीण काम होतं. रात्री मी आणि माझी बायको सफाईचं काम करायचो.’

‘झाडू, फर्शी, धुणीभांडी… हे काम आम्ही एका मॉलमध्ये करायचो. मी दिवसा काम करयचो तेव्हा बायको सब्वेमध्ये सँडविच तयार करायची. बाकी राहिलेली कामं आम्ही दोघे वाटून घ्यायचो. पण तेव्हा देखील आयुष्याचा आनंद घेतला…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.