बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी सतत चर्चा करणाऱ्यांना पंकज त्रिपाठी यांच्याकडून चपराक!

"कमाईच्या आकड्यांविषयी असलेलं वेड मला समजत नाही. खरंतर आकड्यांचा हा विषय त्याच्याशी संबंधित लोकांसाठी असायला हवा आणि त्यात निश्चितपणे चाहत्यांचा समावेश नसावा. त्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नाही तर कलेकडे लक्ष द्यावं," असंही ते म्हणाले.

बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी सतत चर्चा करणाऱ्यांना पंकज त्रिपाठी यांच्याकडून चपराक!
OMG 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 7:14 PM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिनेते पंकज त्रिपाठी हे दमदार आणि सहज अभिनयकौशल्यासोबतच त्यांच्या विचारसरणीसाठीही ओळखले जातात. विविध मुलाखतीत त्यांनी मांडलेले विचार सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या त्यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करतोय. सेन्सॉर बोर्डाकडून ‘A’ प्रमाणपत्र मिळूनही या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी असलेल्या क्रेझबद्दल वक्तव्य केलं आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नसतानाही समाजाच्या एका विशिष्ट वर्गाला चित्रपटांच्या कमाईबाबत किती वेड असतं याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केला.

“आपल्या आयुष्यापेक्षा जास्त चित्रपटांच्या कमाईची चिंता”

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांना चित्रपटाच्या कमाईबाबत काय वाटतं असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “यश हे नक्कीच फायद्याचं आहे पण अनेकांसाठी कला हा त्यांच्या हृदयाच्या खूप जवळचा विषय असतो. तर बॉक्स ऑफिस कलेक्शन हे चाहत्यांमध्ये आपापसांत चाललेलं युद्ध असतं. कमाईचा आकडा जाणून मलाही आनंद होतो. मला आकड्यांचं महत्त्वसुद्धा माहीत आहे. जेव्हा एखादा चित्रपट चांगली कमाई करतो, तेव्हा त्याचा फायदा निर्मात्यांना आणि संपूर्ण टीमला होतो. कलाकारांचाही भाव वधारतो. पण जेव्हा ट्विटरवर एखाद्या चित्रपटाच्या कमाईवरून तर्कवितर्क लावले जातात, तेव्हा मला आश्चर्य वाटतं. मला असा प्रश्न पडतो की, ही कोण लोकं आहेत, ज्यांना आपल्या आयुष्यापेक्षा जास्त चित्रपटांच्या कमाईची चिंता आहे?”

“बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे नव्हे तर कलेकडे लक्ष द्यावं”

“कमाईच्या आकड्यांविषयी असलेलं वेड मला समजत नाही. खरंतर आकड्यांचा हा विषय त्याच्याशी संबंधित लोकांसाठी असायला हवा आणि त्यात निश्चितपणे चाहत्यांचा समावेश नसावा. त्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नाही तर कलेकडे लक्ष द्यावं,” असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कमाईबाबत सतत चर्चा करणाऱ्या लोकांना पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले, “भावा, तुम्ही लोकं करता तरी काय? आयुष्यात अजून काही विषय आहेत की नाही? आकड्यांबद्दल मी बोलणं ठीक आहे, कारण माझं आयुष्य त्याच्याशी निगडीत आहे. ज्यांना बॉक्स ऑफिस कलेक्शनची पर्वा असते, अशा प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की, बाबा तुम्ही माझ्या कलेनं चिंतीत व्हा माझ्या चित्रपटांच्या कमाईने नाही.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.