Pankaj Tripathi | “यापुढे ते सीन्स अजिबात करणार नाही”; पंकज त्रिपाठी यांचा खुलासा

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या भूमिकांविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयीचा खुलासा केला. भूमिकेची गरज असली तरी ठराविक सीन्स करणार नसल्याचं पंकज यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलंय.

Pankaj Tripathi | यापुढे ते सीन्स अजिबात करणार नाही; पंकज त्रिपाठी यांचा खुलासा
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 12:43 PM

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच शांत आणि विनम्र स्वभावासाठी ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या भूमिकांविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा खुलासा केला आहे. आता भविष्यात मी ऑनस्क्रीन शिवीगाळ करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मिर्झापूरसारख्या सीरिजमध्ये त्यांनी ज्याप्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या, त्यात त्यांना ऑनस्क्रीन बरेच अपशब्द वापरावे लागले होते. मात्र यापुढे भूमिकेची गरज असली तरी असं काम करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

“काही भूमिकांमुळे मला पडद्यावर अपशब्दांचा वापर करावा लागला होता. असं फक्त तीन-चार वेळा घडलंय. उदाहरण द्यायचं झाल्यास मिर्झापूर. कधी-कधी एखाद्या भूमिकेला प्रामाणिक दाखवण्यासाठी असं करावं लागतं. मात्र मी नेहमी याचा विचार करतो की कथा त्याच्याशिवाय कथा पुढे सरकू शकते का? कथेसाठी हे किती महत्त्वाचं आहे? तरंच मी अशा भूमिका करतो”, असं ते म्हणाले.

याविषयी बोलताना पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले, “आता मी ठरवलंय की जरी भूमिकेची गरज असली तरी मी ते काम करणार नाही. यासाठी त्यांनाच कोणता तरी क्रिएटिव्ह मार्ग शोधून काढावा लागेल. चित्रपट निर्मिती ही एक क्रिएटिव्ह प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यात अजून काय वेगळं केलं जाऊ शकतं, याचा विचार तुम्हाला करावाच लागेल. मिर्झापूर या सीरिजमध्ये मी असाच एक प्रतिशब्द शोधून काढला होता. विशुद्ध लडके हो तुम, असा डायलॉग मी बदलला होता. त्याचा काही विशेष अर्थ नाही. तरी कोणत्याही अपशब्दापेक्षा तो शब्द चांगला होता.”

हे सुद्धा वाचा

मिर्झापूर ही भारतातील लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक आहे. 2018 मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजचा तिसरा सिझन या वर्षाच्या अखेरपर्यंत येण्याचा अंदाज आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठीने कालीन भैय्या नावाच्या एका डॉनची भूमिका साकारली होती.

पंकज त्रिपाठी यांना नुकताच ‘मिमी’ या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. 21 ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. पंकज यांनी त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार वडील पंडीत बनारस त्रिपाठी यांना समर्पित केला. “आज बाबूजी असते तर ते खूप खुश झाले असते”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.