लग्नाच्या ५ वर्षांनंतर ‘ही’ अभिनेत्री होणार आई, PCOD मुळे प्रेग्नेंसीमध्ये आल्या अनेक समस्या

PCOD मुळे अभिनेत्रीने आई होण्याची अपेक्षाच सोडली होती, पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर 'ही' अभिनेत्री होणार आई... म्हणाली..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

लग्नाच्या ५ वर्षांनंतर 'ही' अभिनेत्री होणार आई, PCOD मुळे प्रेग्नेंसीमध्ये आल्या अनेक समस्या
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 2:14 PM

मुंबई : आई होणं हा जगातील सर्वात सुखद अनुभव आहे आणि त्यासाठी प्रत्येक महिला उत्साही असते. पण आता धावपळीच्या आयुष्यात महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. महिलांना अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे आई होण्यासाठी महिलांना अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. असचं काही टीव्ही अभिनेत्री पंखुरी अवस्थी (Pankhuri Awasthy) हिच्यासोबत देखली झालं आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर अभिनेत्री आई होणार आहे. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध कपल गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं जगात स्वागत करणार आहेत. आभिनेत्री सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे.

पंखुरी अवस्थी सध्या आयुष्यातील खास क्षणांचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने सांगितलं, लग्नाच्या दोन वर्षांनंतर पंखुरी हिला आई व्हायचं होतं. पण एका आजारामुळे आभिनेत्रीला आई होणं शक्य नव्हतं. आजाराबद्दल खुद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

हे सुद्धा वाचा

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नाच्या दोन वर्षांनंतर पंखुरी हिला आई व्हायचं होती. पती गौतमला देखील दोन वर्षात मुल हवं होतं. पण प्रेग्नेंसासाठी अनियमित मासिक पाळी म्हणजे पीसीओडी (PCOD) मुळे अभिनेत्रीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, पीसीओडीमुळे तिची मासिक पाळीचं चक्र बिघडलं होतं. आजाराने व्यथित झालेल्या पंखुरीने सर्व काही देवावर सोडलं आणि गर्भधारणेचा विचार करणं देखील सोडून दिलं. पण गेल्या वर्षी चाचणी केल्यानंतर अभिनेत्रीला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल काळलं.

प्रेग्नेंसीबद्दल कळताच गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी प्रचंड आनंदी आहेत. दोघांच्या लग्नाला पाच वर्ष पुर्ण झाली आहेत. पहिल्यांदा बाबा होणार असल्यामुळे गौतम पत्नी आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेतो. एवढंच नाही तर, अभिनेत्याने स्वतःचं रोजचं वेळापत्रक देखील पत्नीसाठी बदललं आहे.

गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी यांच्यामध्ये वयाचं अंतर आहे. गौतम अभिनेत्रीपेक्षा १४ वर्ष मोठा आहे. दोघांची ओळख ‘सूर्यपुत्र कर्ण’ मालिकेच्या सेटवर झाली होती. दोघांच्या पहिल्या ओळखीचं रुपांतर मैत्री त्यानंतर प्रेमात झालं. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१८ मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या पाच वर्षांनंतर दोघे आई – बाबा होणार आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.