सलमान खानच्या सुरक्षेसाठी पापाराझीही अलर्ट मोडवर; एकमताने घेतला महत्त्वाचा निर्णय

सलमानला येणाऱ्या धमक्यांचे गांभीर्य पाहता पापाराझीही अलर्ट मोडवर आले आहेत. सलमानचे फोटो न काढण्याचा पापाराझींनी सर्वांनुमते एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सलमान खानच्या सुरक्षेसाठी पापाराझीही अलर्ट मोडवर; एकमताने घेतला महत्त्वाचा निर्णय
सलमान खान
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 1:24 PM

Salman Khans Safety बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. सलमान खानला सतत येत असलेल्या धमक्यांमुळे मुंबई पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात आता पापाराझीही अलर्ट मोडवर आले असून त्यांनी सर्वांनुमते सलमान खानबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सलमानचे फोटो न काढण्याचा पापाराझींचा महत्त्वाचा निर्णय

सलमान खान हे बॉलीवूडमधील एक नावाजलेलं नाव आहे. प्रमुख सुपरस्टार्समध्ये त्याचंही नाव हे प्रामुख्याने पुढे असतं. पापाराझींचा तर सलमान हा फार आवडीचा विषय आहे. सलमानचे फोटो, आगामी सिनेमा, शुटींग, एवढचं नाही तर समुद्रकिनाऱ्यावरील त्याचा फेरफटका , त्याच्या अशा अनेक बारिक हालचालींवर पापाराझींची नजर असतेच.  सलमानची प्रत्येक अपडेट पापाराझी त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. मात्र सध्या सलमानच्या सुरक्षेवरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांपासून ते सलमानच्या अंगरक्षकांपर्यंत सर्वचजण त्याच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत.

सलमानला आलेल्या धमक्यांचं गांभीर्य लक्षात घेता पापाराझींनी देखील पुढे येऊन त्याच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जोपर्यंत हे वातावरण शांत होत नाही किंवा जोपर्यंत सलमानवर असलेलं हे संकट दूर होतं नाही तोपर्यंत सलमानचे कोणतेच फोटो काढायचे नाही. तसेच त्याचे कोणतेच क्षण शूट करायचे नाही. त्याच्याबद्दलची कोणतीच माहिती बाहेर येऊ द्यायची नाही असा निर्णय पापाराझींनी घेतला आहे.

फोटोंपेक्षा सलमानची सुरक्षा महत्त्वाची

सध्या सलमान मुंबई फिल्मसिटीमध्ये हिंदी बिग बॉस १८ ची शुटींग करत आहे. शुक्रवारी खूप उशीरापर्यंत सलमानची शुटींग सुरु होती. शुटींग संपेपर्यंत सेटवरील कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नव्हती तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सेटवर येऊ दिले जात नाही आहे. सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. पापाराझींनी  याचीच दखल घेत सलमानच्या घडामोडींवर लक्ष ठेवणे, किंवा त्याचे फोटो काढणे, त्याचा पाठलाग करत त्याच्या सेटवर जाणे टाळले आहे.

पापाराझींनीही सलमान खानच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत त्याची सुरक्षा जास्त महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. तसेच सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात अजून भर नको म्हणून सलमानचे अपडेट घेण्यासाठी आणि ते चाहत्यांपर्यंत पोहचवण्यासाठी पापाराझींनी स्वत:ला रोखलं आहे.

पापाराझींचा निर्णय म्हणजे सलमानवरचं प्रेम

पापाराझींना आता सलमानच्या फोटोंपेक्षा त्यांनं सुरक्षित राहणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे पापाराझींनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे आवडत्या अभिनेत्यावर असलेलं प्रेम आणि सलमानच्या सुरक्षेबाबत असलेला त्यांचा आदर दिसून आला. एवढंच नाही तर, पापाराझींनी खऱ्या अर्थाने आपल्या कामाशी असलेला प्रामाणिकपणा आणि माणुसकी याचं उत्तम उदाहरणही सर्वांसमोर ठेवलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.