शेवटच्या क्षणापर्यंत सिद्धार्थ शुक्लाच्या जवळ होती शहनाज गिल, तेव्हा नक्की काय घडलं? अनेक वर्षांनंतर सत्य समोर

Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाच्या वेळी नक्की काय झालं होतं? अभिनेत्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शहनाज गिल होती सोबत, अनेक वर्षांनंतर जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या नात्याची चर्चा

शेवटच्या क्षणापर्यंत सिद्धार्थ शुक्लाच्या जवळ होती शहनाज गिल, तेव्हा नक्की काय घडलं? अनेक वर्षांनंतर सत्य समोर
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 12:23 PM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : दिवगंत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाला अनेक वर्ष लोटली आहेत. तरी देखील चाहते आणि सेलिब्रिटी आजही सिद्धार्थ याला विसरु शकलेले नाहीत. सिद्धार्थ शुक्ला याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ‘बिग बॉस’नंतर सिद्धार्थ शुक्ला यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. ‘बिग बॉस’मध्ये अभिनेत्याच्या आयुष्यात अभिनेत्री शहनाज गिल हिची एन्ट्री झाली. बिग बॉसनंतर देखील दोघांना अनेक ठिकाणा स्पॉट करण्यात आलं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र सुरु होत्या. अशात एक वाईट दिवस आला आणि सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झालं. सिद्धार्थ याच्या निधनानंतर शहनाज आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. दरम्यान, अनेक वर्षांनंतर सिद्धार्थच्या निधनाबद्दल पारस छाब्रा याने मोठा खुलासा केला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पारस म्हणाला, ‘मला सांगण्यात आलं, सिद्धार्थ याचं निधन झालं तेव्हा शहनाज त्याच्यासोबत होती. जेव्हा आपल्या समोर एखादा व्यक्ती अखेरचा श्वास घेतो. तेव्हा तो क्षण विसरणं फार कठीण असतं. शहनाज हिच्यासाठी तो क्षण फार कठीण होता. शहनाज हिला पाहिल्यानंतर आजही मला सिद्धार्थ याची आठवण येते. आज देखील असे अनेक क्षण असतील जेव्हा शहनाज हिला सिद्धार्थ याची प्रचंड आवठवण येत असेल.’

पुढे सिद्धार्थ याच्यासोबत असलेल्या आठवणी सांगत पारस म्हणाला, ‘मी आणि सिद्धार्थ आध्यात्मामुळे सोबत होते. आम्ही रात्री उशीरापर्यंत महादेव यांच्याबद्दल अनेक गप्पा करायचो. आमच्या नात्याबद्दल कोणाला माहिती नव्हतं. पण आमची मैत्री घट्ट होती. आजही सिद्धार्थ याला विसरु शकलो नाही..’ असं देखील पारस म्हणाला..

हे सुद्धा वाचा

सिद्धार्थ शुक्ला याचं निधन

सिद्धार्थ शुक्ला याचं निधन 2 सप्टेंबर 2021 मध्ये झालं. वयाच्या 40 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं. अभिनेत्याच्या निधनानंतर कलाविश्वाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. आजही सिद्धार्थ याने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सिद्धार्थ याच्या निधनानंतर शहनाज देखील पूर्णपणे कोलमडली होती. अभिनेत्याच्या निधनानंतर कित्येक दिवस अभिनेत्री अनेक दिवस सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर होती. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी अभिनेत्री सिद्धार्थ याच्याबद्दल बोलताना दिसते. आता शहनाज हिने स्वतःला सावरलं आहे.

शहनाज हिने ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोशल मीडियावर देखील शहनाज कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.