IPL मॅचदरम्यान स्टेडियममध्ये ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा; अभिनेत्रीने डोक्याला लावला हात
परिणीती आणि राघव हे लवकरच साखरपुडा करणार आहेत, असं म्हटलं जातंय. येत्या 13 मे रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांत सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये जेव्हा राघवचं नाव समोर आलं, तेव्हा साखरपुडा पुढे ढकलण्याची चर्चा सुरू झाली.
मोहाली : लग्नाच्या जोरदार चर्चांदरम्यान अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढासोबत आयपीएल मॅचला हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र त्यावर परिणीती किंवा राघवने स्पष्ट प्रतिक्रिया अद्याप दिली नाही. या चर्चांदरम्यान दोघांना एकत्र आयपीएल मॅच पाहण्यासाठी आल्याचं पाहून चाहतेसुद्धा खुश झाले. मोहालीच्या स्टेडियमवर चाहत्यांनी ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. हे पाहून परिणीती आणि राघव यांनाही हसू अनावर झालं.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांचा सामना पाहण्यासाठी राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पंजाब क्रिकेट असोसिएशन मोहाली पोहोचले होते. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्टेडियमच्या एका स्टँडवर उभे असलेले परिणीती आणि राघव आणि दुसऱ्या स्टँडवरील प्रेक्षक ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा देतानाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या घोषणा ऐकून दोघांनाही हसू अनावर झालं. परिणीतीने तर या घोषणा ऐकून डोक्यालाच हात लावला.
View this post on Instagram
परिणीती आणि राघव हे लवकरच साखरपुडा करणार आहेत, असं म्हटलं जातंय. येत्या 13 मे रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांत सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये जेव्हा राघवचं नाव समोर आलं, तेव्हा साखरपुडा पुढे ढकलण्याची चर्चा सुरू झाली. राघवचं नाव चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून नाही तर ईडीने फक्त त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं.
It’s in public now♥️ MP Raghav Chadha & Actress Parineeti Chopra spotted watching IPL 2023 game in Mohali….@raghav_chadha @ParineetiChopra pic.twitter.com/g02knMx4Su
— Meena Joshi (@MeenaJoshi_) May 3, 2023
राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. अर्जुन कपूरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.