Parineeti – Raghav यांच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्रीची आई भावुक; नव्या जोडप्यासाठी हृदयस्पर्शी पोस्ट

लेकीचा खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा झाल्यामुळे अभिनेत्रीच्या आईचा आनंद गगनात मावेना... परिणीतीच्या आईने हृदयस्पर्शी पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना...

Parineeti - Raghav यांच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्रीची आई भावुक; नव्या जोडप्यासाठी हृदयस्पर्शी पोस्ट
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 12:29 PM

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या. पण दोघांनी कायम त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं. अखेर शनिवारी दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला. मोठ्या रॉयल पद्धतीत परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा संपन्न झाला. दोघांच्या साखरपुड्यासाठी बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातील अनेकांनी हजेरी लावली… शिवाय अनेकांनी सोशल मीडियावर परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत दोघांना शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री परिणीती हिच्या आईने देखील लेक आणि जावयासाठी खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीतीच्या आईने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगत आहे. परिणीतीची आई रीना चोप्रा यांनी साखरपुड्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

हे सुद्धा वाचा

भावना व्यक्त करत रीना चोप्रा म्हणाल्या, ‘आपल्या आयुष्यात असे अनेक कारणं असतात ज्यामुळे विश्वास होतो की देव आहे.. मी सर्वांचे आभार मानते… तुम्ही याठिकाणी आलात आणि तुमचे आशीर्वाद दोघांना दिले..’ सध्या रीना चोप्रा यांच्या सोशल मीडिया पोस्टची तुफान चर्चा रंगत आहे.

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही साखरपुडा सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, शिवनेता नेते आदित्य ठाकरे आणि टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन उपस्थित होते.

परिणीती आणि राघव यांच्या साखरपु्ड्याची सुरुवात शनिवारी संध्याकाळी ५ वाजता झाली. त्यानंतर जवळपास रात्री ९ वाजता परिणीती आणि राघव यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

राघव चड्ढा साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत म्हणाले, ‘ती होकार देईल यासाठी मी प्रार्थना केली… ‘ सध्या सर्वत्र राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची चर्चा सुरु आहे. दोघांनी फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी देखील परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.