परिणीती चोप्रा – खासदार राघव चड्ढा अडकणार विवाहबंधनात? जाणून घ्या किती झालंय दोघांचं शिक्षण

परिणीती चोप्रा - खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे, 'त्या' व्हिडीओमुळे चर्चेत असलेल्या परिणीती - राघव यांचं किती झालंय शिक्षण?

परिणीती चोप्रा - खासदार राघव चड्ढा अडकणार विवाहबंधनात? जाणून घ्या किती झालंय दोघांचं शिक्षण
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 11:34 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे. एवढंच नाही तर, परिणीती आणि राघव चड्ढा यांची लग्नाची तयारी देखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

अशात खासदार राघव चड्ढा यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. रघाव चड्ढा सीए आहेत. खासदार असण्यासोबतच राघव चड्ढा दिल्ली जज बोर्डाचे उप-अध्यक्ष देखील आहेत. राघव चड्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेत सीएचं शिक्षण घेतलं. याआधी राघव यांनी बाराखंबा रोडच्या मॉर्डन स्कूलमधून शिक्षण घेतलं. दिल्ली विश्वविद्यालयातून राघव यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. राघव चड्ढा यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्यां वडिलांचं नाव सुनील चड्ढा आणि आईचं नाव अल्का चड्ढा असं आहे.

हे सुद्धा वाचा

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी परिणीती बँकिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रयत्न करत होती. वयाच्या १७ व्या वर्षी परिणीती शिक्षणासाठी लंडनमध्ये गेली होती. पण बँकिंग क्षेत्रात करियर न करता परिणीतीने अभिनयात स्वतःची ओळख निर्माण केली.

परिणीतीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेते अमिताभ बच्चन स्टारर ‘उंचाई’ सिनेमात देखील परिणीती मुख्य भूमिकेत झळकली. परिणीती आता ३४ वर्षांची आहे. परिणीतीचे वडील पवन चोप्रा उद्योजक असून आई रीना चोप्रा गृहिणी आहे. परिणीतीला दोन लहान भाऊ आहेत.

परिणीती हिने अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात घर केलं. परिणीताने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेडीज vs रिक्की’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते कायम परिणीताच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

परिणीतीबद्दल काय म्हणाले राघव चड्ढा?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संसदेतून बाहेर आल्यानंतर राघव त्यांच्या कारच्या दिशेने जात होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांनी अभिनेत्रीसोबतच्या नात्याबद्दल विचारले. परिणीती चोप्रासोबतच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंनंतर राघव यांना प्रश्न विचारण्यात आला. राघव यांना परिणीतीसोबत लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. तेव्हा चड्ढा हसत म्हणाले, ‘ तुम्ही मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारू नका.’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.