‘प्रत्येक नवीन कपल…’, परिणाती चोप्रा – राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील Inside Video तुफान व्हारयल

| Updated on: May 14, 2023 | 8:42 AM

राघव चड्ढा यांनी सर्वांसमोर परिणीती चोप्रा हिला केलं किस... साखरपुड्यातील Inside Video ची सर्वत्र चर्चा... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

प्रत्येक नवीन कपल..., परिणाती चोप्रा - राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील Inside Video तुफान व्हारयल
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला आहे. सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. अखेर शनिवारी दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला.

सध्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील एक इनसाईड व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये राघव आणि परिणीती एकमेकांसोबत प्रचंड आनंदी दिसत आहे. शिवाय राघव चड्ढा यांनी सर्वांसमोर होणाऱ्या पत्नीला किस देखील केलं आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘मला असं का वाटत आहे की परिणीती प्रियांका चोप्रा हिची कॉपी करत आहे…’, अन्य एक युजर म्हणाला, ‘प्रत्येक नवीन कपल असाच असतो.. त्यात नवीन काय?’ तर अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणीती आणि राघव दोघांनी साखरपुड्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत. राघव चड्ढा साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत म्हणाले, ‘ती होकार देईल यासाठी मी प्रार्थना केली… ‘ सध्या सर्वत्र राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची चर्चा सुरु आहे. दोघांनी फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी देखील परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.