Parineeti Chopra – Raghav Chadha यांचा साखरपुडा; खासदार म्हणाले, ‘…यासाठी मी प्रार्थना केली’

| Updated on: May 14, 2023 | 8:24 AM

परिणीती चोप्रा हिला अंगठी घातल्यानंतर राघव चड्ढा यांनी व्यक्त केली भावना... दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

Parineeti Chopra - Raghav Chadha यांचा साखरपुडा; खासदार म्हणाले, ...यासाठी मी प्रार्थना केली
Follow us on

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा  यांचा १३ मे रोजी मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या. पण दोघांनी कायम त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं. अखेर शनिवारी दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपु्ड्याची सुरुवात शनिवारी संध्याकाळी ५ वाजता झाली. त्यानंतर जवळपास रात्री ९ वाजता परिणीती आणि राघव यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

परिणीती आणि राघव दोघांनी खास फोटो पोस्ट केले आहेत. राघव चड्ढा साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत म्हणाले, ‘ती होकार देईल यासाठी मी प्रार्थना केली… ‘ सध्या सर्वत्र राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची चर्चा सुरु आहे. दोघांनी फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी देखील परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

एवढंच नाही तर, परिणीती चोप्रा हिने देखील राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुड्याचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘प्रार्थना केली.. मी होय म्हणाले…’ असं लिहिलं आहे… परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यात अनेक सेलिब्रीटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. परिणीतीच्या साखरपुड्यासाठी सर्वात आधी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हजेरी लावली.

 

 

प्रियांका चोप्रा हिच्यानंतर परिणीतीचे कुटुंबीय येऊ लागले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही साखरपुडा सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, शिवनेता नेते आदित्य ठाकरे आणि टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन हे देखील दोघांच्या साखरपुड्यासाठी पोहोचले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीतीने तिच्या साखरपुड्यात पेस्टल कलरचा ड्रेस घातला होता. परिणीतीच्या सारपुड्यासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने डिझाइन केला होता.. तर राघव चड्ढा यांनी देखील पेस्टल कलरचा ड्रेस घातला होता. सध्या सर्वत्र दोघांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.