Parineeti chopra हिच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर; शाही थाटात संपन्न होणार विवाहसोहळा

Parineeti chopra | परिणीती चोप्रा - राघव चड्ढा यांच्या लग्नाची तारीख ठरली... शाही थाटात 'या'ठिकाणी परिणीती - राघव घेणार 'सप्तपदी', साखरपुड्यानंतर अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा

Parineeti chopra हिच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर; शाही थाटात संपन्न होणार विवाहसोहळा
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 12:09 PM

मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जोडीदारासोबत लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. रिपोर्टनुसार, सप्टेंबर महिन्यात परिणीती आणि राघव विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांच्या लग्नाच्या तयारीला देखील सुरुवात झाली आहे. परिणीती – राघव यांच्या लग्नात कुटुंब आणि मित्र-परिवार उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं लग्न उदयपूर याठिकाणी होणार आहे. एवढंच नाही तर, लग्नाची तारीख आणि इतर मोठ्या अपडेट देखील समोर आल्या आहेत. सध्या सर्वत्र परिणीती – राघव यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, राघव आणि परिणीती यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. पण दोघांनी अद्याप लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण चोप्रा, चड्ढ कुटुंबासोबतच परिणीती – राघव यांच्या टीमने लग्नाची तयारी सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच दोघांचं लग्न पार पडणार आहे.

कधी होणार राघव – परिणीती यांचं लग्न..

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव यांचं लग्न उदयपूर याठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. लग्न उदयपूर येथील द ओबेरॉय उदयविलास हॉटेलमध्ये होणार आहे. परिणीती आणि राघव २५ सप्टेंबर रोजी लग्न करणार आहेत. तर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी हळदी आणि मेंहदी आणि संगीत होणार आहे.

हे सुद्धा वाचा

लग्नात राघव आणि परिणीती यांना शुभेच्छा देण्यासाठी पाहुणे २२ सप्टेंबर रोजी उदयपूर याठिकाणी जाणार आहेत. लग्नात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि निक जोनस देखील उपस्थित राहणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला. तेव्हा अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. पण आता दोघं नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.