Parineeti Chopra – Raghav Chadha शाही अंदाजात अडकणार विवाहबंधनात, लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर…

साखरपुड्यानंतर परिणीती चोप्रा - राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा... कधी आणि कुठे विवाहबंधनात अडकणार नवीन कपल... लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर

Parineeti Chopra - Raghav Chadha शाही अंदाजात अडकणार विवाहबंधनात, लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर...
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 10:58 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला आहे. साखरपुड्यानंतर अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.. साखपुड्याप्रमाणेच चोप्रा – चड्ढा कुटुंबाने परिणीती – राघव यांच्या लग्नाबद्दल मौन बाळगलं आहे.. सध्या बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, राघव – परिणीती यांचं लग्न शाही थाटात होणार आहे. दोघांचं लग्न फार रॉयल असणार आहे. लग्नात फक्त जवळच्या व्यक्तींना निमंत्रीत करण्यात येणार आहे. हिवाळ्यात राघव – परिणीती विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राघव – परिणीती यांचं लग्न ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांच्या लग्नात अभिनेत्र प्रियांका चोप्रा देखील उपस्थित राहणार आहे.

रिपोर्टनुसार, राघव – परिणीती राजस्थान याठिकाणी शाही थाटात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. अन्य सेलिब्रिटींप्रमाणे राघव – परिणीती यांचं लग्न देखील रॉयल आणि प्रायव्हेट असणार आहे… दोघांच्या लग्नात अनेक दिग्गज व्यक्ती राघव – परिणीती यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत..

मिळालेल्या माहितीनुसार, राघव – परिणीती यांच्या लग्नात कतरिना कैफ, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, किआरा आडवाणी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. साखरपुड्यानंतर आता राघव – परिणीती यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे… पण लग्नाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही…

सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. अखेर शनिवारी दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला.

दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.