Parineeti-Raghav | परिणीती आणि राघव यांचा या आलिशान हाॅटेलमध्ये पार पडणार विवाह, एका रूमचं भाडं ऐकून बसेल धक्का!
राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत. नुकताच दिल्लीमध्ये त्यांचा साखरपुडा हा पार पडलाय. या साखरपुड्यातील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. चाहते आता यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर हे थेट प्रेमात झाले. अनेकदा परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मुंबईमध्ये (Mumbai) स्पाॅट केले गेले. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी कधीच त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाही. दिल्ली येथे अत्यंत आलिशान पध्दतीने काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा हा पार पडलाय. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. परिणीती चोप्रा हिने साखरपुड्यातील फोटो आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा ही रडताना दिसली होती. ती अत्यंत भावूक झाली, त्यानंतर राघव चड्ढा याने परिणीती हिला मिठी मारली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यानंतर चाहते आता यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाविषयी मोठी बातमी पुढे आलीये.
रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न अत्यंत आलिशान पध्दतीने राजस्थानमध्ये पार पडणार आहे. विशेष म्हणजे नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नाचे ठिकाण देखील फायनल केले आहे. याच वर्षी शेवटी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लग्न करणार आहेत. राजस्थानमधील अत्यंत आलिशान हाॅटेलमध्ये यांचे लग्न राॅयल पध्दतीने पार पडेल.
रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी राजस्थानमधील द ओबेरॉय उदयविलास बुक केले आहे. उदयपुर येथे हे आलिशान हाॅटेल आहे. विशेष म्हणजे या द ओबेरॉय उदयविलास या हाॅटेलच्या एका रूमचा किराया 35 हजार रूपये आहे. स्विमिंग, महाल असे बरेच काही या हाॅटेलमध्ये आहे. विशेष म्हणजे अत्यंत निसर्गरम्य हे हाॅटेल असल्याचे देखील सांगितले जात आहे.