Parineeti Chopra हिचं पहिलं प्रेम, पहिली किस…, ‘लव्ह लाईफ’मधील खास गोष्ट विसरु शकली नाही अभिनेत्री
परिणीती चोप्रा हिच्याकडून पहिल्या किसबद्दल मोठा खुलासा; 'लव्ह लाईफ'मधील खास गोष्ट आजही विसरु शकली नाही अभिनेत्री... सर्वत्र परिणीतीच्या खासगी आयु्ष्याची चर्चा...
मुंबई | बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येणार नाही. पण काही सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्यात असलेल्या खास व्यक्तीबद्दल चाहत्यांना सांगतात. तर काही सेलिब्रिटी मात्र त्यांचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेवतात. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या देखील खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगतात. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण आयुष्यातील पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने, तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि पहिल्या किसबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती. (Parineeti Chopra first kiss)
पहिलं प्रेम आणि पहिली किसबद्दल सांगताना परिणीती म्हणाली, ‘मी कधीही डेटवर गेली नाही. आम्ही घरीच भेटायचो आणि एकत्र वेळ व्यतीत करायचो. आम्ही एकत्र सिनेमे पाहायचो.. आवडते पदार्थ ऑर्डर करायचो आणि खायचो..’ एवढंच नाही परिणीती जेव्हा १८ वर्षांची होती, तेव्हा तिने पहिली किस केली असं देखील अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं..
शिवाय अभिनेत्रीने मुलाखतीत अभिनेता सैफ अली खान क्रश असल्याचं देखील सांगितलं होतं.. परिणीती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना परिणीती चोप्रा हिचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण अभिनेत्रीने कधीही तिच्या खासगी आयुष्याबद्दल कबुली दिली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार परिणीती लवकरच खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न करणार आहे. परिणीती आणि राघव यांचा दिल्लीत मोठ्या थाटात साखरपुडा झाला. आता अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (parineeti chopra wedding)
खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत हॉटेल बाहेर जेव्हा परिणीतीला स्पॉट करण्यात आलं, तेव्हा पासून अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. सुरुवातीचे काही दिवस परिणीती हिने राघव यांच्यासोबत असलेलं नातं स्वीकारलं नव्हतं. पण आता १३ मे रोजी राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी मोठ्या थाटात साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्यात अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा झाल्यापासून परिणीती कायम चर्चेत असते.