Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परिणीती चोप्रा हिने पती राघव चड्ढा याच्यासोबतचे विदेशातील ‘हे’ फोटो केले शेअर, खासदार…

परिणीती चोप्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे दोघांचे लग्न अत्यंत आलिशान पद्धतीने झाले. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

परिणीती चोप्रा हिने पती राघव चड्ढा याच्यासोबतचे विदेशातील 'हे' फोटो केले शेअर, खासदार...
parineeti chopra
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 5:37 PM

अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. राजस्थानमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये हे एकमेकांच्या प्रेमात पडले. परिणीती चोप्राचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने झाले. लग्न झाल्यापासून परिणीती चोप्रा ही चित्रपटांपासून तशी दूर आहे. दुसरीकडे चित्रपटांपासून दूर असली तरीही परिणीती चोप्रा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय.

परिणीती चोप्रा ही सतत पती राघव चड्ढा याच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये राघव चड्ढा याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याची काळजी घेताना दिसली. त्यानंतर पुढील काही दिवस दोघे लंडनमध्येच होते.

आता नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर काही अत्यंत खास असे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये परिणीती चोप्रा हिच्यासोबत राघव चड्ढा हा देखील दिसत आहे. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा खास वेळ एकमेकांसोबत घालवताना दिसत आहेत. परिणीतीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

परिणीती चोप्रा ही राघव चढ्ढा यांच्यासोबत नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ यांच्यात झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम विम्बल्डन 2024 मध्ये सहभागी झाले. ज्याचे फोटो परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत हिने खास कॅप्शन शेअर केल्याचे देखील बघायला मिळतंय. विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त अशा लूकमध्येही परिणीती चोप्रा ही दिसत आहे.

व्हाइट रंगाचा फॉर्मल आउटफिट घातल्याचे फोटोमध्ये परिणीती चोप्रा हिने दिसत आहे. यातील काही छायाचित्रांमध्ये परिणीती राघवसोबत मैदानात पोज देताना दिसली. दोघांनी एकमेकांचे हात पकडल्याचे देखील फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. यादरम्यान परिणीती चोप्रा ही स्ट्रॉबेरी खाताना देखील फोटोमध्ये दिसत आहे. 

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.