अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. राजस्थानमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये हे एकमेकांच्या प्रेमात पडले. परिणीती चोप्राचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने झाले. लग्न झाल्यापासून परिणीती चोप्रा ही चित्रपटांपासून तशी दूर आहे. दुसरीकडे चित्रपटांपासून दूर असली तरीही परिणीती चोप्रा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय.
परिणीती चोप्रा ही सतत पती राघव चड्ढा याच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये राघव चड्ढा याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याची काळजी घेताना दिसली. त्यानंतर पुढील काही दिवस दोघे लंडनमध्येच होते.
आता नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर काही अत्यंत खास असे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये परिणीती चोप्रा हिच्यासोबत राघव चड्ढा हा देखील दिसत आहे. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा खास वेळ एकमेकांसोबत घालवताना दिसत आहेत. परिणीतीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
परिणीती चोप्रा ही राघव चढ्ढा यांच्यासोबत नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ यांच्यात झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम विम्बल्डन 2024 मध्ये सहभागी झाले. ज्याचे फोटो परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत हिने खास कॅप्शन शेअर केल्याचे देखील बघायला मिळतंय. विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त अशा लूकमध्येही परिणीती चोप्रा ही दिसत आहे.
व्हाइट रंगाचा फॉर्मल आउटफिट घातल्याचे फोटोमध्ये परिणीती चोप्रा हिने दिसत आहे. यातील काही छायाचित्रांमध्ये परिणीती राघवसोबत मैदानात पोज देताना दिसली. दोघांनी एकमेकांचे हात पकडल्याचे देखील फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. यादरम्यान परिणीती चोप्रा ही स्ट्रॉबेरी खाताना देखील फोटोमध्ये दिसत आहे.