लग्नानंतर परिणीती चोप्रा हिने घेतला नको होता तोच निर्णय, चाहत्यांना बसला धक्का, थेट करिअरच..
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. राघव आणि परिणीती चोप्रा यांचा विवाहसोहळा हा अत्यंत आलिशान पद्धतीने राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिने आप नेता आणि खासदार राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा विवाहसोहळा अत्यंत राॅयल पद्धतीने राजस्थान येथील उदयपूरमध्ये पार पडलाय. या लग्नसोहळ्यास अत्यंत जवळचे व्यक्ती उपस्थित होते. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले.
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पहिल्यांदा मुंबईमध्ये स्पाॅट झाले. मात्र, यांनी कधीच त्यांच्या रिलेशनवर काहीच भाष्य केले नाही. स्वत: अरविंद केजरीवाल हे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नासाठी उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री देखील या लग्नासाठी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसली होती की, राघव चड्ढा याच्या लग्नानंतर परिणीती चोप्रा ही अभिनय क्षेत्राला कायमचा राम राम करणार आहे. हेच नाही तर परिणीती चोप्रा ही अभिनय सोडून चक्क राजनीतीमध्ये प्रवेश करणार आहे. आता परिणीती चोप्रा हिनेच थेट मोठी घोषणा केल्याचे बघायला मिळत आहे.
View this post on Instagram
परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये परिणीती चोप्रा हिच्याकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. परिणीती चोप्रा हिने व्हिडीओ शेअर करत ही घोषणा केलीये की, ती आता संगीतामध्ये आपले करिअर करणार आहे. आता परिणीती चोप्रा हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. परिणीतीने अभिनयाला रामराम केल्याने तिचे चाहते हैराण झाले आहेत.
परिणीती चोप्रा हिने तिच्या आतापर्यंतच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. परिणीती चोप्रा हिचा काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याच्यासोबतचा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाची काहीच प्रमोशन करताना परिणीती चोप्रा ही दिसली नाही. परिणीती चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.