Parineeti Raghav Wedding | परिणीती-राघवच्या लग्नाचे व्हिडीओ समोर; पतीसोबत अभिनेत्रीचा डान्स

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे 24 सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. उदयपूरमधील 'द लीला पॅलेस'मध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव डान्स करताना दिसून येत आहेत.

Parineeti Raghav Wedding | परिणीती-राघवच्या लग्नाचे व्हिडीओ समोर; पतीसोबत अभिनेत्रीचा डान्स
परिणीती चोप्रा, राघव चड्ढाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 9:44 AM

उदयपूर | 26 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. 24 सप्टेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर इथल्या ‘द लीला पॅलेस’मध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नातील कोणतेच फोटो आणि व्हिडीओ लीक होऊ नयेत यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. रविवारी लग्न पार पडल्यानंतर सोमवारी सकाळी परिणीती आणि राघवने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले. त्यानंतर आता लग्नाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

परिणीती आणि राघवच्या लग्नातील काही विधींचे व्हिडीओ समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये परिणीती वरमाळेच्या विधीसाठी राघवच्या दिशेने चालत येताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये वर आणि वधू एकत्र चालत येत आहेत. यावेळी बॅकग्राऊंडमध्ये ‘हे शुभारंभ’ हे गाणं ऐकू येत असून त्यावर दोघं नाचताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लग्नातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राघव चड्ढा यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल हे ढोलच्या गजराचा आनंद घेताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

लग्नानंतर परिणीती आणि राघव हे उदयपूर जेट्टीजवळ एकत्र दिसले. चंदीगडमध्ये पाहुण्यांसाठी खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी ते उदयपूरहून चंदीगडला रवाना झाले. त्यापूर्वी नवविवाहित जोडप्याने फोटोसाठी पापाराझींसमोर पोझ दिले. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’ तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

नीना गुप्ता, सानिया मिर्झा, गुल पनाग, मनिष मल्होत्रा, निम्रत कौर, अनिता हसनंदानी यांसारख्या सेलिब्रिटींनी परिणीती आणि राघववर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावर्षी मे महिन्यात परिणीती आणि राघवने साखरपुडा केला. या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.