Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Raghav Wedding | बहीण परिणीतीच्या लग्नात प्रियांकाची गैरहजेरी? पोस्टमुळे चर्चांना उधाण

राजस्थानमधील उदयपूरमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी हे दोघेजण उदयपूरला पोहोचले आहेत. त्यांच्या लग्नाची तयारीसुद्धा झाली आहे. मात्र परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय.

Parineeti Raghav Wedding | बहीण परिणीतीच्या लग्नात प्रियांकाची गैरहजेरी? पोस्टमुळे चर्चांना उधाण
Priyanka and Parineeti ChopraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 11:03 AM

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्ढा हे आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 24 सप्टेंबर रोजी राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये हो दोघं धूमधडाक्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीय उदयपूरला पोहोचले. हळूहळू इतरही पाहुणे तिथे पोहोचत आहेत. उदयपूर एअरपोर्टवरून सर्व पाहुण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. परिणीतीची चुलत बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा या लग्नासाठी परदेशातून उदयपूरला कधी येणार, याची प्रतीक्षा चाहते करत आहेत. मात्र यादरम्यान प्रियांकाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांकाने तिच्या या पोस्टमध्ये परिणीतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टवरून नेटकरी असा अंदाज व्यक्त करत आहेत की ती परिणीतीच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. म्हणूनच तिने सोशल मीडियाद्वारे बहिणीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं, ‘मला आशा आहे की तू तुझ्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी अशाच प्रकारे खुश आणि संतुष्ट असशील. तुझ्यावर सतत प्रेमाचा वर्षाव होत राहो.’ प्रियांका परदेशातून भारतात लग्नाला येऊ शकत नसल्यानेच तिने अशी पोस्ट लिहिली असावी, असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा

परिणीतीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका भारतात आली होती. मात्र आता लग्नासाठी काहीही कारणास्तव ती येऊ शकणार नसल्याचं कळतंय. परिणीती आणि राघवच्या लग्नासाठी दोघांच्या कुटुंबीयांशिवाय अभिनेत्री भाग्यश्री पतीसह उदयपूरला पोहोचली आहे. याशिवाय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम शैलेश लोढासुद्धा उदयपूरला पोहोचले आहेत. परिणीती तिच्या लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान करणार आहे. तर राघव हा डिझायनर पवन सचदेवाद्वारे डिझाइन केलेले कपडे परिधान करणार आहे.

हे लग्न उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये होणार आहे. त्यासाठी हा पॅलेस अत्यंत सुंदररित्या सजवण्यात आला आहे. या पॅलेसचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये पॅलेसच्या आतील दृश्य पाहायला मिळत आहे. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’ हा अत्यंत आलिशान हॉटेल आहे.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.