Raghav-Parineeti Engagement | साखरपुड्यात ‘या’ व्यक्तीच्या उपस्थितीमुळे मोठा वाद, परिणीती चोप्रा हिने केली सर्वांची बोलती बंद, थेट
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा नुकताच दिल्ली येथे साखरपुडा पार पडलाय. अत्यंत राॅयल पध्दतीने यांचा साखरपुडा हा मोजक्या लोकांच्या उपस्थित झालाय. साखरपुड्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा साखरपुडा हा दिल्लीमध्ये पार पडलाय. गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे प्रचंड चर्चेत होते. लंडनमध्ये यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. मुंबईमध्येही हे दोघे अनेकदा स्पाॅट झाले. मात्र, कधीच परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाही. अगोदर यांच्या सुपारीचा कार्यक्रम पार पडला आणि त्यांनी दिल्लीमध्ये 13 मे ला साखरपुडा केला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो हे सोशल मीडियावर (Social media) शेअर केले. यांच्या साखरपुड्यातील अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
अत्यंत राॅयल पध्दतीने परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडला. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील एका फोटोमुळे त्यांना प्रचंड ट्रोल केले जात होते. शेवटी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना परिणीती चोप्रा ही दिसत आहे. नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी हजेरी लावली होती. याचा एक फोटो व्हायरल झाला, त्यानंतर तूफान ट्रोल केले जात होते. आता नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह हे दिसत आहेत.
फोटो शेअर करत परिणीती चोप्रा हिने, अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांच्याबद्दल लिहिले आहे. परिणीती चोप्रा हिने लिहिले की, अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंहजी यांचा आर्शिवाद घेऊन आनंद वाटला. आमच्या साखरपुड्यात त्यांची उपस्थिती खूप जास्त महत्वाची आहे. साखरपुड्यात सहभागी झाल्याबद्दल जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांचे धन्यवाद मानताना परिणीती चोप्रा ही दिसत आहे.
जो वाद सुरू होता, त्यावर एका प्रकारे परिणीती चोप्रा हिने उत्तरच दिले आहे. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये दिसत आहे की, राघव आणि परिणीती चोप्रा हे हात जोडून अकाल तख्त साहिबच्या जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांच्या समोर उभे आहेत. आता परिणीती चोप्रा हिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.