Parineeti Chopra : ‘मी मानले देवाचे आभार…’, एक्स-बॉयफ्रेंडने साथ सोडल्यानंतर वाईट होती परिणीतीची अवस्था
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा हिने देखील केलाय ब्रेकअपचा सामना... वाईट अवस्थेतून बाहेर आल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, 'मी मानले देवाचे आभार...', सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा, कोण होता 'तो'?
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आता तिच्या वैवाहिक आयुष्यात आंनदी आहे. सप्टेंबर महिन्यात अभिनेत्रीने आप पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केलं. परिणीती आणि राघव यांनी उदयपूर याठिकाणी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नापूर्वी रिलेशनशिपबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. पण राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी परिणीती चोप्रा रिलेशनशिपमध्ये होती.
राघव चड्ढा यांच्याआधी देखील अभिनेत्रीच्या आयुष्यात खास व्यक्ती होती. २०१७ मध्ये परिणीती चोप्रा आणि असिस्टेंट दिग्दर्शक चरित देसाई याच्या नात्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं. पण अभिनेत्रीने कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही, पण ब्रेकअपबद्दल मोठं वक्तव्य केलं. (Parineeti Chopra love story)
एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘माझं एक प्रचंड वाईट ब्रेकअप झालं आहे. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होता. कारण याआधी मी कधीही रिजेक्शनचा सामना केला नव्हता. या दरम्यान मी खचली होती. तेव्हा मला फक्त आणि फक्त माझे कुटुंबिय आणि मित्रांचा आधार होता. पण मी आता आनंदी आहे.’
पुढे अभिनेत्री म्हणली, ‘मी या गोष्टीचा अनुभव आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर घेतला आणि ज्यामुळे मला प्रचंड मदत झाली. त्या ब्रेकअपसाठी मी देवाचे आभार मानेल… त्या घटनेनंतर माझ्यात अनेक सकारात्मक बदल झाले….’ आज परिणीती बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे.
परिणीती आणि राघव यांचं लग्न…
लग्नानंतर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीतीने चाहत्यांसोबत आनंद शेअर केला होता. इंस्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो पोस्ट केले होते.
फोटो पोस्ट करत परिणीती चोप्रा हिने कॅप्शनमध्ये, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’ असं लिहिलं.