Parineeti Chopra | लग्नाचा चुडा भरताना कशा होत्या परिणीती चोप्रा हिच्या भावना, Unseen Photo व्हायरल
Parineeti Chopra | परिणीती चोप्रा हिच्या लग्नातील Unseen Photo वेधत आहे चाहत्यांचं लक्ष... लग्नाचा चुडा भरताना कशो होत्या अभिनेत्रीच्या भावना, फोटो व्हायरल.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा...
मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्रीने आप पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केल. परिणीती आणि राघव यांनी उदयपूर याठिकाणी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. सध्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यासह अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटी राघव आणि परिणीती यांच्या लग्नात उपस्थित होते. सोशल मीडियावर लग्नात आलेल पाहुणे आणि लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो व्हायरल होत आहे. आता प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी परिणीतीच्या चुडा कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये परिणीती चोप्रा पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये तिचा चुडा कार्यक्रम पार पडताना दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीच्या बांगड्या गुलाबी रंगाच्या कपड्याने झाकल्या आहेत. तसेच बांगड्यात सुंदर कस्टमाईज्ड कलिरे लटकत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड आनंदी दिसत आहे.
View this post on Instagram
फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. सांगायचं झालं तर, परिणीती आणि राघल यांचं रिसेप्शन चंदीगड आणि दिल्ली येथेही होणार आहे. सध्या सर्वत्र परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परिणीती आणि राघव यांनी केला डान्स
लग्नानंतर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा डान्स करताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीतीने चाहत्यांसोबत शेअर केला आनंद.. इंस्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो पोस्ट करत परिणीती चोप्रा हिने कॅप्शनमध्ये, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’ असं लिहिलं.