Parineeti – Raghav Wedding | परिणीतीच्या लग्नाच्या ओढणीवर लिहिलेले खास शब्द तुम्ही नोटीस केले?
Parineeti - Raghav Wedding | परिणीती चोप्रा हिने लग्नाच्या ओढणीवर पतीसाठी लिहिले आहेत खास शब्द; लग्नाचे फोटो अनेकांनी पाहिले, पण अभिनेत्रीच्या ओढणीवर लिहिलेले खास शब्द तुम्ही नोटीस केले? सध्या सर्वत्र परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा...
मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | राजस्थानमधील तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. राघव चढ्ढा हे पाहुण्यांसोबत वरात घेऊन बोटीतून लीला पॅलेसमध्ये पोहोचले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघल आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. २३ सप्टेंबर पासून त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींची सुरुवात झाली. त्यानतंर शाही थाटात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नातील पहिले फोटो समोर आले आहे. फोटो अनेकांनी पाहिले पण अभिनेत्रीच्या लग्नाच्या ओढणीवर पतीसाठी लिहिलेले खास शब्द तुमच्या लक्षात आलेत का?
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण परिणीतीने तिच्या लग्नाचा पहिला लूक शेअर केला आहे. तिने तिच्या लग्नाच्या लूकसह डोक्यावर एक लांब ओढणी घेतली होती, ओढणीवर एक खास शब्द लिहिलेला आहे.
परिणिती चोप्रा हिने तिच्या लग्नात पारंपरिक नाही तर, पेस्टल रंगाच्या लेहेंगामध्ये दिसली होती. ज्यासोबत तिने न्यूड मेकअपला पसंती दिली, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. साध्या प्लेन ओढणीवर गोल्डन रंगाच्या वर्कमध्ये परिणीती हिने तिच्या ओढणीवर पती ‘राघव’ यांचं नाव लिहिलं आहे.
मनीष मल्होत्रा हिने परिणीती चोप्राचा संपूर्ण वेडिंग लूक डिझाइन केला होता. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाला सानिया मिर्झा, मधू चोप्रा, हरभजन सिंग, सीएम अरविंद केजरीवाल, पंजाबचे सीएम भगवंत मान यांच्यासह अनेक स्टार्स आणि बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती.
प्रियांका चोप्रा का नाही आली लग्नाला?
पापाराझीने मधू चोप्रा यांना विचारलं लग्न कसं झालं आणि प्रियांका चोप्रा का आली नाही? तर आई मधू चोप्रा म्हणाल्या की, लग्न चांगलं झालं आणि प्रियांका हिला कामामुळे येता आलं नाही.. सध्या सर्वत्र परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.
दोघांना एकत्र हॉटेलमध्ये स्पॉट केल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण तेव्हा दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितलं नाही. अखेर साखरपुड्यानंतर परिणीती – राघव यांच्या त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. दोघांचा साखरपुडा देखील मोठ्या थाटात असून, उदयपूर याठिकाणी परिणीती – राघव विवाहबंधनात अडकले.